"दिशा महाराष्ट्राची" या युट्युब चॅनलच्या वतीने सानपाडा येथे पहिले राज्यस्तरीय कवी संमेलन आणि सन्मान सोहळा उत्साहात संपन्न
आबलोली
"दिशा महाराष्ट्राच"' या युट्युब चॅनलच्या वतीने रविवार दिनांक १४ सप्टेंबर २०२५ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर समता भवन, सानपडा, नवी मुंबई येथे प्रथमच राज्यस्तरीय कवी संमेलन उत्साहात संपन्न झाले. यावेळी विविध स्तरातील मान्यवरांचा सन्मान सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी चंद्रकांत जगताप तसेच कवी संमेलन अध्यक्ष म्हणुन कोकणातील सुप्रसिद्ध साहित्यिक इक्बाल शर्फ मुकादम यांच्या प्रमुख उपस्थितीत होते प्रमुख पाहुणे म्हणुन डॉ. विशाल माने, संगीता जुमडे, ऍड. पूजा कांबळे, साहित्यिक नरेंद्र पवार, राजेंद्र शेलार तसेच गौतम नेवरेकर यांची उपस्थिती होती.मान्यवरांचे हस्ते दिप प्रज्वलन करून छ. शिवाजी महाराज, राज्य घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांचे पूजन करून प्रतिमांना पुष्पहार अर्पण करण्यात आले त्यानंतर कवी संमेलन सुरु होण्यापूर्वी दिशा महाराष्ट्राची या युट्युब आणि वेब पोर्टलचे मुख्य संपादक तुषार नेवरेकर यांनी कार्यक्रमाची थोडक्यात प्रस्तावना करून प्रमुख पाहुण्यांचे शाल, पुष्पगुछ तसेच सन्मानचिन्ह देऊन स्वागत केले.
कवी संमेलनाला महाराष्ट्रातून ऐकून ३० कवी सहभागी झाले होते. त्यांनी सुंदर अशा वेगवेगळ्या विषयावर कविता सादर केल्या. त्यांना पेक्षकांनी अपेक्षित साथ देखील दिली. कवी संमेलन अध्यक्ष यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात उपस्थित साहित्यिकांना अनमोल असे मार्गदर्शन केले आणि लिखाणास शुभेच्छा दिल्या. सन्मान सोहळ्यात ऐकून ३७ मान्यवरांना त्यांच्या उल्लेखनीय कामकाजाबद्दल राज्यस्तरिय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. तसेच समाजात निःस्वार्थीपणे काम करणाऱ्या तीन सामाजिक संस्थांचा देखीलयावेळी सन्मान करण्यात आला. यामध्ये "आम्ही कोकणकर" या संस्थेस राज्यस्तरीय आदर्श कोकणी युवा संघटना पुरस्कार २०२५, मंडणगड दापोली सामाजिक प्रतिष्ठान यांना "राज्यस्तरीय आदर्श युवा संघटना पुरस्कार २०२५" तसेच संगमरत्न फाउंडेशन यांना "राज्यस्तरीय आदर्श सामाजिक संघटना पुरस्कार २०२५ "या पुरस्काराने मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.कवी संमेलनाचे सूत्रसंचालन युवा साहित्यिक प्रथमेश जाधव तसेच चंद्रसेन जाधव यांनी तर सन्मान सोहळ्याचे सूत्रसंचालन श्रीतेज नेवरेकर व सपना नेवरेकर यांनी केले. शेवटी संपादक तुषार नेवरेकर यांनी उपस्थितांचे आभार मानून भविष्यकालीन उपक्रमांची माहिती दिली आणि कार्यक्रमाची सांगता केली.
Comments
Post a Comment