कृषि समृद्धी योजनेअंतर्गत शेती साठी आवश्यक असणाऱ्या पायाभूत सुविधांचा लाभ घेणेसाठी शेतकरी बांधवांनी महाडिबिटी पोर्टलवर अर्ज करावेत.......कृषि विभाग.
कृषि क्षेत्रात भांडवली गुंतवणूक वाढवून पायाभूत सुविधांचे निर्मितीसाठी शासनाने कृषि समृद्धी योजना जाहिर केली असुन यामधून शेतीसाठी आवश्यक असणाऱ्या बाबींसाठी अनुदान दिले जात आहे. यासाठी शासनाचे महाडिबिटी पोर्टलवर विविध घटकांसाठी आॕनलाईन अर्ज करण्यासाठीची सुविधा उपलब्ध आहे. यामध्ये
अ)यांत्रिकीकरण* अंतर्गत ट्रॕक्टर ,औजारे बँक, पाॕवर टिलर, पाॕवर विडर, ब्रश कटर, रिपर, स्वयंचलित भात लावणी यंत्र , मनुष्य चलित भात लावणी यंत्र , भात कापणी यंत्र ,भात मळणी यंत्र ,मनुष्य चलित भात मळणी यंत्र , सुपारी काढणी यंत्र , चेन साॕ, मिनी राईस मिल, पाॕवर स्प्रेअर , रोटाव्हेटर ईत्यादी बाबी.
ब)सिंचन सुविधा* अंतर्गत शेततळे , शेततळे अस्तरीकरण , मोटार संच, इंजिन संच ईत्यादी.
क)फलोत्पादन* अंतर्गत सामुदायिक शेततळे, शेततळे अस्तरीकरण, हरितगृह, शेडनेट, मल्चिंग पेपर, क्राॕप कव्हर, पॕक हाऊस, शीतगृह, रेफर व्हॕन, प्रक्रिया केंद्रे , फलोत्पादन यांत्रिकीकरण, रोपवाटिका उभारणी, फळबाग पुनर्रजीवन ई.
ड) सुक्ष्म सिंचन* अंतर्गत ठिबक सिंचन व तुषार सिंचन.
इ) भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड* अंतर्गत विविध फळपिकांची लागवड ईत्यादी बाबींसाठी *कृषि विभागाचे महाडिबिटी( https://mahadbt.maharashtra.gov.in/farmer/Agrilogin/Agrilogin) या पोर्टलवर* आॕनलाईन अर्ज करावेत.
वरिल सर्व बाबींसाठी *प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य(FCFS)* या तत्वावर निवड केली जाते. योजनेचा लाभ घेण्यासाठी *अॕग्रीस्टॕक फार्मर आयडी* बंधनकारक आहे. अनुसुचित जाती- जमाती प्रवर्गातील शेतकरी, महिला , अत्यल्प व अल्प भुधारक शेतकरी यांना मापदंडाचे 50 % व ईतर शेतकरी यांना मापदंडाचे 40% मर्यादेत आनुदान दिले जाते.
त्याचबरोबर *प्रधानमंत्री सुक्ष्म अन्न प्रक्रिया योजनेअंतर्गत* कोणत्याही प्रक्रिया उद्योग नविन उभारणी अथवा विस्तारीकरण यासाठी सहाय्यक कृषि आधिकारी अथवा योजनेसाठीचे DRP यांचे मार्फत अर्ज करावेत.
प्रक्रिया उद्योग उभारणीसाठी बँकेचे कर्ज उपलब्ध करून दिले जाते व प्रकल्प खर्चाच्या 35% आनुदान दिले जाते.
तरी जास्तीत जास्त शेतकरी बांधवांनी वरिल योजनांसाठी अर्ज करणेबाबत आवाहन कृषि विभागामार्फत करण्यात येत आहे. अधिक माहितीसाठी सहाय्यक कृषि आधिकारी/ उप कृषि आधिकारी / मंडळ कृषि आधिकारी /तालुका कृषि अधिकारी कार्यालयास संपर्क साधावा.
Comments
Post a Comment