श्री शंकरराव बेझलवार कला व वाणिज्य महाविद्यालयात "एड्स" कार्यशाळा
एसबी महाविद्यालयात "एड्स" कार्यशाळा
By- दिपक चुनारकर
श्री शंकरराव बेझलवार कला व वाणिज्य महाविद्यालयात महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण संस्था अहेरी च्या वतीने महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विजय सोमकुंवर यांच्या मार्गदर्शनाखाली एड्स कार्यशाळा आयोजित करण्यात आली.
या कार्यशाळेचे मुख्य मार्गदर्शक म्हणून रश्मी मारगोनवार यांनी विद्यार्थ्यांना एड्स विषय सखोल मार्गदर्शन केले.
मार्गदर्शनात एचआयव्ही या विषाणूमुळे होणाऱ्या संसर्गाचा अंतिम आणि गंभीर टप्पा आहे, जो शरीराच्या रोगप्रतिकारक शक्तीला कमकुवत करतो. आजार संसर्गजन्य असला तरी प्रतिबंधात्मक उपाययोजना आणि औषध उपचाराने त्यावर नियंत्रण मिळवता येत असून कायमस्वरूपी इलाज नसलेल्या या रोगापासून स्वतःचा बचाव करणे हाच एक मात्र उपाय असल्याचे संकेत कार्यशाळेतून विद्यार्थ्यांना मिळाले.
तसेच या कार्यक्रमाचे संचालन प्रा.घोडेस्वार एन.एस.एस.कार्यक्रम अधिकारी यांनी तर मंचावर प्रा.गजानन जंगमवार एन.एस.एस. कार्यक्रम अधिकारी व प्रभारी प्राचार्य डॉ. रविंद्र हजारे उपस्थित होते.
ही कार्यशाळा यशस्वी होण्यासाठी महाविद्यालयीन प्राध्यापक व शिक्षकेत्तर कर्मचारी व बहुसंख्य विद्यार्थी उपस्थित होते.
Comments
Post a Comment