वरवेली येथील नमन कलाकार,उत्कृष्ट मृदुंगमणी शिवराम दौलत रांजाणे यांचे वृद्धापकाने निधन

आबलोली 
गुहागर तालुक्यातील वरवेली रांजाणेवाडी येथील राजहंस नमन मंडळाचे प्रमुख पदाधिकारी, उत्कृष्ट मृदुंगमणी शिवराम दौलत रांजाणे यांचे वृद्धापकालाने मंगळवार दि. १६ सप्टेंबर रोजी त्यांच्या राहत्या घरी निधन झाले. मृत्युसमयी त्याचे वय ९० वर्षे होते.राजहंस नमन मंडळ वरवेली रांजाणेवाडी गट क्रमांक १ या नमन लोक कलेतील उत्कृष्ट मृदुंगमणी म्हणून त्यांचे नाव होते . मुंबई, तसेच रत्नागिरी जिल्ह्यामध्ये वरवेली रांजाणेवाडी येथील नमन खेळे प्रसिद्ध असून या नमन खेळ्यातील मृदुंगमणी म्हणून त्यांचा नाव लौकिक होता. त्यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. त्यांचा सातवा विधी सोमवार दि. २२ सप्टेंबर तर उत्तरकार्य शनिवार दि.२७ सप्टेंबर रोजी त्यांच्या निवासस्थानी होणार आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगे, सुना,मुली, जावई,नातवंडे असा मोठा परिवार आहे.

Comments