माकड आणि केल्टी यांचा उपद्रव रोखण्यासाठी विशेष मोहीम राबवून, शासनाने आंबा फळ नुकसानीची नोंद पिक विमा मध्ये समाविष्ट करावी - मिलिंद चाचे यांची आग्रही मागणी

आबलोली 
 आंबा या फळ पिकामुळे महाराष्ट्र शासनाला आंबा बागायतदार यांच्याकडून चांगल्या प्रकारे महसूल मिळत असतो. परंतु रत्नागिरी जिल्ह्यातील बागायतदार यांचे वन्य प्राणी माकड आणि केल्टी तसेच अवेळी येणाऱ्या पावसामुळेही फार मोठे नुकसान होत असते. माकड आणि केल्टी यांचा वाढलेला उपद्रव या उपद्रवमुळे शेतकरी राजा चिंतेत पडला असून आंबा बागायतरांना आपल्या पिकाच्या नुकसानीसाठी डोक्यावर हात मारण्याची वेळ येते. हातात काही पीक येत नाही हा त्रास आंबा बागायतदार शेतकऱ्यांना गेली कित्येक वर्ष सहन करावा लागतो आहे,त्यामुळेच शासनाने महाराष्ट्र वन विभाग यांनी जानेवारी ते मे महिना मध्ये माकड आणि केल्टी यांच्या बंदोबस्तासाठी विशेष मोहीम राबवून आंबा बागायतदार शेतकरीचे नुकसान कमी करण्याचा प्रयत्न करावा तसेच शासनाने आंबा या फळ पिकाच्या नुकसानीची नोंद पीक विमा मध्ये समाविष्ट करावी अशी आग्रही मागणी काँग्रेसचे माजी गुहागर तालुकाध्यक्ष मिलिंद आत्माराम चाचे यांनी राज्याचे वनमंत्री गणेश नाईक, पालकमंत्री उदय सामंत आणि रत्नागिरी जिल्ह्याचे जिल्हाधिकारी यांना निवेदनाद्वारे केली आहे. आणि तशा सूचना पिक विमा कंपनीला कराव्यात अशी विशेष सूचनाही या निवेदनात मिलिंद आत्माराम चाचे यांनी केले आहे.

Comments