आबलोली वरची पागडेवाडी येथे गौराईंचे अतिशय उत्साही वातावरणात आगमन
आबलोली
परंपरेनुसार नदीवर जाऊन पाऊसात उगवणाऱ्या रानटी तिरडा, सोनवेली सारख्या फुलांनी विधिवत मुखवट्यांची माहेरवाशिनिकडून पूजा अर्चा करून ढोल ताश्यांच्या गजरात अतिशय उत्साही वातावरणात गुहागर तालुक्यातील आपली येथील वरची पागडेवाडी येथे गौराईंचे घरोघरी आगमन झाले असून अगदी लहान थोर माहेरवाशिनिंकडून नटून थटून पारंपारिक नऊ वारी तर कुणी सहा वारी साड्यांच्या पेहरावात डोक्यात वेणी गजऱ्यांची माळा माळून दीड दिवसांची पाहुनी म्हणून येणाऱ्या गौराईला आपल्या घरचीच कुणीतरी माहेरवाशिनी आपल्या घरी माहेरी येत्येय अश्या भावनेने आणण्यात आली, यात चिल्या, पिल्या छोट्या माहेरवाशिनिंही अगदी हिरीरीने सहभागी होतांना दिसतात.काल झालेल्या उत्साही आगमणानंतर आज तेवढ्याच भक्तीभावाने व उत्साहात घरोघरी गौराईचं सौभाग्यवती सासुरवाशिनिंकडून वानाने भरलेले सूप गौराईसमोर ठेऊन पूजा अर्चा करण्यात आली.
Comments
Post a Comment