गुहागर वरचापाट येथील साखरकर कुटुंबियांचा २१ दिवसीय "साखरकर मोरया"विविध कार्यक्रमांनी संपन्न * साखरकर कुटुंबीयांची सहावी पिढी जोपासत आहेत सामुदायिक गणेशोत्सवची परंपरा


 आबलोली: 
गुहागर वरचापाट येथील साखरकर कुटुंबियांच्या वतीने "आजोबांचा आशीर्वाद"या निवासस्थानी २१ दिवसीय गणरायाची मूर्ती विराजमान असून विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत असून नवसाला पावणारा "साखरकरांचा मोरया"म्हणून या गणपतीची ख्याती सर्वत्र आहे. या गणरायाच्या दर्शनासाठी परिसरातून भाविक उपस्थित राहुल आशीर्वाद घेतात. या २१ दिवसीय साखरकरांच्या मोरयाची सर्व साखरकर कुटुंबीय भक्तीभाव व श्रद्धेने सेवा करत असून दररोज आरती भजन तसेच जाकडी नृत्य महिलांचे सांघिक नृत्य असे धार्मिक कार्यक्रम संपन्न होत आहेत.साखरकर कुटुंबीयांची सहावी पिढी ही सामुदायिक गणेशोत्सवाची परंपरा आजही मोठ्या श्रद्धेने जोपासत आहेत. या "साखरकर मोरया"चे विसर्जन बुधवार दिनांक १७ सप्टेंबर रोजी सायंकाळी भव्य विसर्जन मिरवणूक काढून गुहागर वरचापाट येथील समुद्रात विसर्जन करण्यात येणार आहे. या मोरयाच्या दर्शनासाठी भाविकांनी उपस्थित रहावे असे आवाहन गुहागर वरचा पाट येथील साखरकर कुटुंबीयांच्या वतीने करण्यात आले आहे.

Comments