कंरबवणे गावच्या महात्मा गांधी तंटामुक्त समिती अध्यक्षपदी सुनिल भिकुराम तांबे यांची तिसऱ्यांदा बिनविरोध निवड

आबलोली 
         चिपळूण तालुक्यातील कंरबवणे गावच्या महात्मा गांधी तंटामुक्त समिती अध्यक्षपदी सुनिल भिकुराम तांबे यांची तिसऱ्यांदा बिनविरोध निवड ग्रामसभेत जाहीर करण्यात आली आणि टाळ्यांचा कडकडाट झाला.सुनिल भिकुराम तांबे हे चिपळूण तालुका बौध्दजन हितसंरक्षक समिती कंरबवणे शाखा सरचिटणीस,बौध्दजन विकास मंडळाचे उपाध्यक्ष, न्यु इंग्लिश स्कूल कंरबवणे शिक्षण कमीटी सल्लागार, सदस्य आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षाचे तालुका सल्लागार अशी चमकदार उल्लेखनीय कामगिरी केली असून शैक्षणिक, राजकीय क्षेत्रात काम करणाऱ्या अष्टपैलू व्यैक्तीमत्वाची कंरबवणे गावच्या तंटामुक्त समिती अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल कंरबवणे गावचे सरपंच दत्ताराम शिंदे,उपसरपंच संजय जाधव, ग्रामपंचायत सदस्य सौ. नंदीनी पवार, सौ. सारिका पवार, सौ. माळी, सौ.सन्नाक , स्वप्नील बांद्रे, संतोष लाड,,ग्रामसेवक चंद्रकांत तटकरे, कंरबवणे शाखा अध्यक्ष सुभेदार भाऊ पवार, उपाध्यक्ष सुरेन्द्र पवार, माजी अध्यक्ष एस. के.पवार, चिटणीस राजु जाधव , माजी उपाध्यक्ष बाळकृष्ण पवार, सुदेश पवार, वैभव पवार, राजेश पवार, सुभाष पवार माजी अध्यक्ष, कापरे विभाग संघटक मिलिंद पवार, आर. पि.आय. सहसचिव भुपेद्र पवार आदी. उपस्थित मान्यवर,ग्रामस्थ यांनी सुनिल भिकूराम तांबे यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस मंगलमय शुभेच्छा दिल्या आहेत.

Comments