भक्तांच्या, तरुणाईच्या आनंदाला उधाण..! मळण येथे श्री.चंडिका देवीचा नवरात्र उत्सव विविध सामाजिक, धार्मिक उपक्रमांनी साजरा होणार

आबलोली 
 गुहागर तालुक्यातील मळण येथे श्री. चंडिका देवीचा नवरात्र उत्सव सामाजिक, धार्मिक अशा विविध उपक्रमांनी साजरा होणार असून भक्तांच्या आणि तरुणाईच्या आनंदाला उधाण आले आहे. मळण हे गाव आनंदीबाई पेशवे यांचे माहेरघर या गावाची रखवाली देवी श्री. चंडिका माता ही माता ही देवी नवसाला पावणारी देवी म्हणून प्रसिद्ध आहे या देवीच्या मंदिरात सभोवतालचे तसेच दूर दूरचे भक्त नवस फेडण्यासाठी येत असतात दरवर्षी नवरात्रौ उत्सवात मंडळाचे सदस्य व गावातील महिला पुरुष ग्रामस्थ मंडळी नऊ दिवस या देवीचा नवरात्र उत्सव अतिशय शांततेत उत्साहात आणि जल्लोषात साजरा करतात यावेळी तरुणाईच्या आनंदाला उधाण आलेले दिसत आहे चंडिका देवीच्या मंदिराला रंग रंगोटी करण्यात आली असून मंदिरा समोरील पटांगणात मंडप घालण्यात आला असून विद्युत रोषणाईसह सजावट करण्यात आली आहे. 
                          श्री चंडिका देवी नवरात्रोत्सव मळण या मंडळाच्या वतीने श्री चंडिका देवी मंदिर येथे सोमवार दिनांक 22 /09/2025 ते गुरुवार दिनांक 02/10/2025 असे दहा दिवस श्री चंडिका देवीचा नवरात्र उत्सव साजरा करण्यात येणार असून वातावरण भक्तीमय झालेले असून श्री चंडिका देवीच्या नवरात्र उत्सवात यामध्ये आरती श्री. सत्यनारायणाची पूजा, महिला मंडळ आणि पुरुष मंडळ यांचा भजनाचा कार्यक्रम, नाचाचे कार्यक्रम, दांडिया रास, आरोग्य शिबिरे, शस्त्रक्रिया शिबिरे, विद्यार्थ्यांच्या विविध स्पर्धा, धार्मिक प्रवचन, हरिपाठ, दांडिया रास स्पर्धा, संगीत खुर्ची स्पर्धा, लकी ड्रॉ सोडत, महाप्रसाद, फॅन्सी ड्रेस स्पर्धा अशा विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आलेले असून दसऱ्याच्या दिवशी सोने लुटण्याचा कार्यक्रम ही उत्साहात संपन्न होणार आहे त्यानंतर स्पर्धांचे बक्षीस वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात येणार आहे.

Comments