पाचेरी सडा गावचे सुपुत्र दिलीप डिंगणकर यांना आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त
वसंतराव शंकर देसाई प्राथमिक विद्यालय वरळी या मराठी प्राथमिक खाजगी अनुदानित शाळेतील शिक्षक आणि गुहागर तालुक्यातील पाचेरी सडा गावचे सुपुत्र दिलीप कृष्णा डिंगणकर यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर ट्रस्ट तर्फे देण्यात येणारा 2025 चा आदर्श शिक्षक पुरस्कार डॉ. बाबासाहेब आंबेडकर ट्रस्ट तथा बुद्ध विहार वरळी मुंबई येथे नुकताच प्रदान करण्यात आला आहे.याबद्दल सर्व विद्यार्थी पालक आणि शिक्षण प्रेमींच्या वतीने सर्व स्तरातून त्यांच्यावर अभिनंदनचा वर्षाव करण्यात येत असून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात येत आहेत.
वरळी कामगार वस्तीत वसंतराव शंकर देसाई प्राथमिक विद्यालयात दिलीप डिंगणकर गुरुजी यांनी 22 वर्ष सेवा केली असून शालेय अध्यापन करताना त्यांनी विविध उपक्रमांमध्ये पुढाकार घेऊन उपक्रम यशस्वी केले. सांस्कृतिक कार्यक्रमात उत्कृष्ट संचालक म्हणून गौरवास्पद काम केले असून शालेय अध्यापनात तंत्रज्ञानाचा प्रभाव वापर करताना शैक्षणिक व्हिडिओ,पीपीटी यांची निर्मिती केली आहे.
मातृभाषेतून शिक्षणाचे महत्त्व पटवून देताना दिलीप डिंगणकर यांनी पालकांचे पालक सभेतून प्रबोधन केले आहे आणि करताहेत. अनेक बालवाड्यांना त्या संदर्भात भेटी देऊन पट नोंदणीसाठी प्रयत्न करत असतात आणि शिक्षकांनाही प्रोत्साहित करतात ज्ञानरचनावाद व आनंददायी अध्यापन पद्धतीच्या सहाय्याने अध्ययन, अध्यापन प्रक्रिया मनोरंजक व बालकेंद्री करणावर त्यांचा अधिक भर असतो. शिष्यवृत्ती व महाराष्ट्र प्रज्ञाशोध परीक्षा या स्पर्धा परीक्षांसाठी त्यांनी विद्यार्थ्यांना मौलिक मार्गदर्शन करून गुणवत्ता यादीत झळकवले आहे. राज्यव्यापी शाळा बंद पण शिक्षण सुरू या ऑनलाइन शिक्षण सेवेचा दोन वर्षे ऑनलाईन अध्यापन केले आहे. तसेच वेशभूषा वकृत्व गायन व क्रीडा स्पर्धा या सर्व स्पर्धकांना विद्यार्थ्यांना ते मार्गदर्शक करीत असतात तसेच शालेय सहसंधीय अंतरशालेय उपक्रमात उत्साहाने सहभागी होऊन उपक्रम यशस्वी होण्यासाठी दिलीप डिंगणकर गुरुजी प्रयत्न करीत असतात.
Comments
Post a Comment