गुहागर खालचापाट जांगळेवाडी येथे घटस्थापनेच्या दुसरे दिवशी पासून श्री नवचंडिका दसरगौरी नवरात्रोत्सव सुरु

श्री नवचंडिका दसरगौरी नवरात्रोत्सव दि.२३/९/२०२५ पासून सुरु झाला देवीचा उत्सव सोहळा.

गुहागर खालचापाट जांगळेवाडी येथे घटस्थापनेच्या दुसरे दिवशी द‌सरगौरीचे आगमनाने सुरु होणारा पारंपरिक नवरात्रोत्सव सोहळा विजया दशमीचे दिवशी सोने लुटून दसरगौरीचा शाही उत्सव सोहळा साजरा केला जातो.

या दरम्यान पारंपारिक जाखडी नृत्याच्या कार्यक्रमांबरोबर कोकणची सुप्रसिद्ध लोककला शक्तीतुरा नृत्याचा अविष्कार अनुभवायला मिळतो. दि. २३/९/२०२५ ते. २/१०/२०२५ या कालावधीत साजरा होणारा देवीचा उत्सव सोहळा दसरगौरीचे आगमनाने-विविधांगी कार्यक्र‌माने तसेच दस-याने आदल्या दिवशी प्रथेप्रमाणे देवीचे ओवस्याचा कार्यक्रम पार पाडला जातो.
दसऱ्याचे दिवशी सोने लुटून वाजत-गाजत मिरवणुकीने देवीच्या विसर्जन सोहळ्याच्या कार्यक्रमाने संपन्न होतो. 
*अशा या शाहि दसरा सोहळ्याचे निमित्ताने भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहुन दर्शन व कार्यक्रमांचा लाभ घ्यावा हि विनंती गुहागर खालचापाट जांगळेवाडी यांचे मार्फत करण्यात आले आहे.

Comments