अहेरी, आलापल्ली व पेरमिलीत तरुणाई सरसावली वेगळ्या विदर्भासाठी केली नागपूर कराराची होळी.

अहेरीत तरुणाई सरसावली वेगळ्या विदर्भासाठी
@ केली नागपूर कराराची होळी 
आलापल्ली व पेर्मिलीतही होळी 

  दिपक चुनारकर::::गडचिरोली (वेलगूर)
      १९५३ साली झालेल्या नागपूर करारानुसार नोकऱ्यांमध्ये, विकासाच्या निधीत, मंत्रिमंडळात विदर्भाचे स्थान यांना 33 टक्के वाटा नसल्याने विदर्भाचे शोषण सुरू आहे. याची अंमलबजावणी वेगळ्या विदर्भाशिवाय शक्य नाही. त्यामुळे नागपूर कराराची होळी आज 28 सप्टेंबरला शहरातील तरुणांनी समोर येऊन विदर्भ विर कैलासवासी राजे विश्वेश्वरराव महाराज चौकात करण्यात आली.
          तालुक्यातील आलापल्ली व पेरमिली येथेही नागपूर कराराची होळी करून राजकीय पक्षांचे लक्ष वेधून वेगळ्या विदर्भाची मागणी लावून धरली.
          ज्या करारानुसार विदर्भाला महाराष्ट्रात सामील करून घेतले त्याची होळी करून निशेधात्मक बाब दर्शवून दिली.
    दार आयोग, जेवीपी कमिशन, फजल अली आयोग, संगमा आयोग बसवून वेगळ्या विदर्भाची शिफारस केल्यावरही विदर्भ अजून पर्यंत दिला नाही.
          यामुळे रोजगाराच्या, विकासाच्या, नोकरीच्या संधी पासून आजच्या विदर्भवासी तरुण अंधारात असल्याचे दिसते. 
     आहेरीत नागपूर कराराची होळी करतेवेळी अकॅडमीचे तरुण विद्यार्थी, सेवानिवृत्त प्राचार्य नागसेण मेश्राम, विलास रापरतीवार, छत्रपती गोवर्धन, प्रकाश गुडेलीवार, रवी भांदककार,कवीश्वर गोवर्धन,सत्यनारायण गुप्ता, लोखंडे, उमाजी गोवर्धन, अकॅडमीचे शिक्षक वृंद व गावकरी उपस्थित होते.
     आलापल्ली व पेरमिली येथे मोठ्या संख्येने गावकरी, व्यापारी व तरुणांनी नागपूर कराराची होळी करून निशेधात्मक वेगळ्या विदर्भाची मागणी केली आहे.

Comments