श्री. निळकंठेश्वर मंदिर देवस्थान शृंगारतळी या देवस्थानच्या अध्यक्षपदी रमेश वेल्हाळ तर सचिव पदी सुदीप (पपू )चव्हाण यांची निवड

आबलोली
 गुहागर तालुक्यातील शृंगारतळी येथील श्री. निळकंठेश्वर मंदिर देवस्थान संपूर्ण जिल्ह्यात प्रसिद्ध असून या देवस्थानाच्या विश्वस्त मंडळाची बैठक नुकतीच उत्साहात संपन्न झाली. सदर सभेत नवीन कार्यकारिणीची निवड करण्यात आली. श्री निळकंठेश्वर मंदिर देवस्थानच्या अध्यक्षपदी रमेशदादा वेल्हाळ, उपाध्यक्षपदी मोहनशेठ संसारे, सचिव पदी सुदीप (पप्पू) चव्हाण, खजिनदार पदी जय (दादू) गुहागरकर तर सल्लागारपदी विश्वास बेलवलकर गुरुजी, कायदेशीर सल्लागारपदी प्रतिष्ठित वकील ॲड. सुशील अवेरे तर विश्वस्त म्हणून श्रीकृष्ण बेलवलकर , मनोज (बापू) कोळवणकर, राजकुमार (नाना) वराडकर, संजय पवार, प्रफुल विखारे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. या कार्यकारणीचा कालावधी हा पाच वर्षासाठी असून संपूर्ण कार्यकारिणीचे गुहागर तालुक्यातील विविध सामाजिक, धार्मिक संघटनांकडून अभिनंदन करण्यात येत असून पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात येत आहेत.

Comments