आलापल्ली वेलगुर रस्त्यावर वाघाची दहशत, @ म्हैस ठार

आलापल्ली वेलगुर रस्त्यावर वाघाची दहशत, 
 म्हैस ठार 
   By- दिपक चुनारकर
प्राणहीता वनविकास प्रकल्प एफडीसीएम, आलापल्लीतील कंपार्टमेंट नंबर 16 मध्ये आज सकाळीच रस्त्यावर वाघाने आलापली वेलगुर रोडवरील नाल्याजवळ एका म्हशीला ठार केले. म्हशीच्या अंगावर वाघाच्या पंजाच्या खुणा व जंगलात जाताना पंजाच्या खुणा आढळून आल्या आहेत.    
          त्यामुळे रस्त्यावरून मूलचेरा मार्गे जाणाऱ्या वाहनधारकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. वनविभागाने याची दखल घेऊन वाघाचा बंदोबस्त करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.
मृत म्हशीच्या मालकाला भरपाई सुद्धा देण्याची मागणी केली जात आहे.

Comments