कुडली गावाच्या तंटामुक्ती समिती अध्यक्षपदी सुरेंद्र शांताराम रहाटे यांची दुसऱ्यांदा बिनविरोध निवड

आबलोली 
 गुहागर तालुक्यातील कुडली ग्रामपंचायतीची ग्रामसभा सरपंच नितीन शंकर गावणंग यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच उत्साहात संपन्न झाली. या सभेमध्ये महात्मा गांधी तंटामुक्ती समिती गठीत करण्याचा विषय ग्रामसेवक सुनील कदम यांनी सभागृहासमोर मांडला यावेळी संतोष रामचंद्र पावरी यांनी कुडली गावाच्या तंटामुक्ती समिती अध्यक्षपदी सुरेंद्र शांताराम रहाटे यांची दुसऱ्यांदा बिनविरोध निवड व्हावी अशी सूचना मांडली या सूचनेला मनोहर नारायण निमकर यांनी अनुमोदन दिले त्यानंतर सुरेंद्र शांताराम रहाटे यांची दुसऱ्यांदा बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली आणि त्यानंतर सभागृहात टाळ्यांचा कडकडाट झाला.
                   सुरेंद्र शांताराम रहाटे यांनी यापूर्वी कुडली ग्रामपंचायत सदस्य असतानाही उल्लेखनीय कामगिरी केली आहे तसेच जि.प. मराठी शाळा कुडली नं. 1 या शाळेचे व्यवस्थापन कमिटी अध्यक्ष म्हणूनही त्यांनी उत्तम काम केलेले आहे. सुरेंद्र शांताराम रहाटे यांना सामाजिक कार्याची आवड असून ते दुसऱ्यांच्या सुख - दुःखात, आणि अडचणी धावून जातात अशी त्यांची ख्याती आहे. गावातील सर्व समाजाला सोबत घेऊन गावातील एकोपा, बंधु - भाव आधारित ठेवण्यासाठी कटीबद्ध असल्याचे स्पष्ट मत सुरेंद्र शांताराम रहाटे यांनी आपल्या मनोगत व्यक्त केले यावेळी सरपंच नितीन शंकर गावणंग, ग्रामसेवक सुनील कदम, उपसरपंच संतोष नारायण पावरी यांचे सह ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते. या सर्वांनी नवनिर्वाचित तंटामुक्ती अध्यक्ष सुरेंद्र शांताराम रहाटे यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

Comments