वरवेली येथील नमन कलाकार, उत्कृष्ट मृदुंगमणी शिवराम दौलत रांजाणे यांचे दुःखद निधन - आम. भास्करराव जाधव यांनी वरवेली निवासस्थानी जाऊन केले कुटुंबीयांचे सांत्वन
आबलोली
गुहागर तालुक्यातील वरवेली रांजणेवाडी येथील राजहंस नमन मंडळाचे प्रमुख पदाधिकारी तसेच उत्कृष्ट मृदुंगमणी शिवराम दौलत रांजाणे यांचे वयाच्या 90 व्या वर्षी नुकतेच निधन झाले. या निधनाची बातमी गुहागरचे आमदार भास्करराव जाधव यांना कळताच ते गुहागर दौऱ्यावर आले असता.गुहागर तालुक्यातील वरवेली येथील कै. शिवराम दौलत रांजाणे यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांनी रांजाणे यांच्या कुटुंबियांचे सांत्वन केले. यावेळी आम. भास्करराव जाधव यांचे सोबत जि. प.चे माजी अध्यक्ष विक्रांतदादा जाधव, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे तालुकाध्यक्ष विनायक मुळये, युवक कार्यकर्ते सोहम साथार्डेकर, आमदार भास्करराव जाधव यांचे स्वीय सहाय्यक संतोष तांदळे यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
Comments
Post a Comment