रंगशाळा सिने-नाट्य विद्याल

स्वतः सिने-नाट्य विद्यालय सुरू करावं आणि ते स्वबळावर चालू ठेवावं हे फक्त स्वप्नातच होऊ शकतं असं आधी वाटायचं. पण येणाऱ्या 5 सप्टेंबरला त्या स्वप्नाला प्रत्यक्षात उतरवून 3 वर्षे पूर्ण होतील. रंगशाळा सिने-नाट्य विद्यालयाचं हे स्वप्न माझ्या मेंदूत सुरू होतंच पण कदाचित हे सारिका, मानसी, श्रेया, दिप्ती ह्यांच्या मनातही सुरू होतं. त्यांनी लगेचच प्रत्यक्ष साथ दिली. ह्याला जोड मिळाली डाॅ. नितीन चव्हाण सरांची आणि प्रत्यक्ष काम सुरू झालं. आम्ही सगळेच रंगशाळेच्या पायाभरणीसाठी 3 वर्षे खूप राबलोय, आजही राबतो आहोत. म्हणूनच एक सामान्य टेरेसचा भाग ते आता रंगमंच, कार्यालय, नेपथ्य, प्रकाश साधनं तर सिनेतंत्रासाठी बंदिस्त स्टुडीओ, कॅमेरा इक्विपमेंट्स अशी घोडदौड फक्त 3 वर्षात करता आली. उतार चढाव, वाद विवाद, राग रुसवे, शिव्या शाप हा भाग आम्हालाही चुकला नाहीच पण चालणं थांबलं नाही ते सुरूच राहिलं! खरंतर, हा तीनच वर्षाचा छोटा प्रवासही मला खूप भावनिक करतो. विश्वास बसत नाही. पण भक्कम साथ, एकमेकांबद्दलचा विश्वास, प्रामाणिक आणि सातत्यपूर्ण काम तुम्हाला नेहमी पुढेच नेतं यावर माझा विश्वास आहे. अनेक नवीन कलाकृती आणि कलाउपक्रम नियोजनात आहेत, ज्यावर काम सुरू आहेच. जे हळू हळू आपल्या सर्वांसमोर येतीलच. 
    या तीन वर्षाच्या काळात अनेकांनी आम्हाला सोबतीचे, पाठिंब्याचे हात दिले. तुम्ही सर्व रसिक आमच्या सोबत नेहमी उभे आहातच. सर्वांचेच आभार! 
  ही फक्त सुरूवात आहे अजून खूप काही करायचं आहे. तुमचे आशिर्वाद, शुभेच्छा, प्रेम सतत आम्हा सर्वांसोबत राहूदेत! कार्यक्रमाला नक्की या!!.. मनापासून आभार!
  - प्रदीप शिवगण

Comments