पुण्याच्या पबमध्ये पाकिस्तानी कलाकाराच्या कार्यक्रमाचं आयोजन होत असल्याचा राग
हा सगळा प्रकार रविवारी रात्री पुण्याच्या कल्याणी नगर परिसरातील 'बॉलर' नावाच्या पबमध्ये चडला. या पबमध्ये रविवारी संध्याकाळी नेदरलँडचे नागरिक असणारे इम्रान नासिर खान यांच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. कार्यक्रमाच्या काही वेळ आधी इम्रान नासिर खान हे पाकिस्तानी कलाकार असल्याची आवई सोशल मीडियावर उठली. एकीकडे पहलगाम हल्ला व ऑपरेशन सिंदूरच्या पार्श्वभूमीवर भारत-पाकिस्तान सामन्याला मोठा विरोध पाहायला मिळाल्यानंतर पुण्याच्या पबमध्ये पाकिस्तानी कलाकाराच्या कार्यक्रमाचं आयोजन होत असल्याचा राग आल्यामुळे आंदोलक रात्रीच्या सुमारास मोठ्या संख्येनं या पबच्या बाहेर जमा झाले.
Comments
Post a Comment