कोळवली हायस्कूलचे आर्यन मते आणि साहिल माटल यांचे सुयश

आबलोली
रत्नागिरी जिल्हा क्रीडा कार्यालयाच्या वतीने शैक्षणिक वर्ष 2025 -26 मध्ये गुहागर तालुक्यातील देवघर येथील क्रीडा संकुलामध्ये घेण्यात आलेल्या पावसाळी शालेय क्रीडा स्पर्धेत गुहागर तालुक्यातील ज्ञान प्रसारक शिक्षण संस्था संचलित, माध्यमिक विद्यालय पंचक्रोशी कोळवली या विद्यालयाच्या आर्यन विलास मते या विद्यार्थ्याने 14 वर्षाखालील 200 मीटर धावणे या क्रीडा प्रकारामध्ये तालुक्यामध्ये तृतीय क्रमांक मिळवला आणि कुमार साहिल अनिल माटल या विद्यार्थ्याने 400 मीटर धावणे या क्रीडा प्रकारांमध्ये गुहागर तालुक्यामध्ये द्वितीय क्रमांक मिळवला याबद्दल या खेळाडूंचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.तसेच ज्ञान प्रसारक शिक्षण संस्थेचे सन्माननीय अध्यक्ष शांताराम वाघे, उपाध्यक्ष रामचंद्रजी मोरे,सचिव श्री नारायण मोहिते, खजिनदार वासुदेव डिंगकर, शंकर जोशी तसेच संस्थेच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी व मुख्याध्यापक श्री.विजय पिसाळ यांनी विजयी खेळाडू आणि मार्गदर्शक शिक्षक श्री.बाळासाहेब लवटे, कर्मचारी श्री. विकास कदम या सर्वांचे अभिनंदन करून जिल्हा स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.

Comments