आमसभेत आम. भास्कररावजी जाधव यांनी केला आबलोली ग्रामपंचायतीचा सन्मान

आबलोली :
गुहागर तालुक्यातील निर्मल ग्रामपंचायत आबलोली या ग्रामपंचायती मार्फत संत गाडगेबाबा स्वच्छता अभियान अंतर्गत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्वच्छ ग्राम स्वच्छता स्पर्धा 2023 - 24 मध्ये जिल्हास्तरीय विशेष पुरस्कार प्राप्त केल्याबद्दल पंचायत समिती गुहागर स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) यांचे मार्फत गुहागर मोडका आगर येथील श्री. पूजा मंगल कार्यालय येथे संपन्न झालेल्या आमसभेत निर्मल ग्रामपंचायत आबलोली यांना गुहागरचे विद्यमान आमदार भास्कररावजी जाधव यांच्या हस्ते सन्मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.यावेळी सरपंच सौं. वैष्णवी वैभव नेटके, ग्रामपंचायत अधिकारी बाबुराव सूर्यवंशी,उद्योजक सचिनशेठ बाईत, ग्रामपंचायत सदस्य ऋषिकेश बाईत, माजी सभापती सौं. पूर्वीताई निमुणकर,स्वरा नेटके, पूजा कारेकर उपस्थित होत्या.

Comments