सावित्रीच्या 41 लेकींना आलापल्लीत सायकल वितरण
सावित्रीच्या 41 लेकींना आलापल्लीत सायकल वितरण
By दिपक चुनारकर
. ग्रामीण भागातील मुलींना शाळेत जाण्यासाठी प्रवास सोयीचा होऊन त्यांचे शिक्षण थांबू नये यासाठी राजे धर्मराव हायस्कूल तथा कनिष्ठ महाविद्यालय आलापल्लीच्या वर्ग आठवीच्या 41 विद्यार्थिनींना प्राचार्य संजय कोडेलवार तसेच इतर शिक्षक यांच्या हस्ते मानव विकास कार्यक्रम अंतर्गत सायकलचे वितरण करण्यात आले.
सायकलमुळे दररोज येण्यासाठी प्रोत्साहन मिळेल, वेळेची बचत होईल व खंडित शिक्षण चालू राहणार असल्याचे मत विद्यार्थिनींनी यावेळी व्यक्त केले.
ग्रामीण भागातील शिक्षणाचे गुणवत्ता सुधारून शाळा सोडणाऱ्यांचे प्रमाण कमी होईल तसेच मुलींचा शारीरिक व्यायाम होऊन आरोग्य सुधारण्यासाठी सायकलचा उपयोग होणार असल्याने मुलींच्या चेहऱ्यावर हास्य फुलले होते.
सायकल वितरण वेळी धर्मराव हायस्कूल तथा कनिष्ठ महाविद्यालय आलापल्लीचे
प्राचार्य एस. एस. कोडेलवार
प्रमुख पाहुणे संजय कोंडागुर्ले तसेच समस्त शिक्षक, शिक्षिका आणि शिक्षकेत्तर कर्मचारि यावेळी उपस्थित होते.
Comments
Post a Comment