"उंबरठा होता साक्षीला" या नाट्यप्रयोगातून मिळालेल्या नफ्यातून जि.प. शाळा भातगाव तिसंग नं.2 साऊंड सिस्टम व विद्यार्थ्यांना पॅड वितरण कार्यक्रम संपन्न

आबलोली :
 " उंबरठा होता साक्षीला" या नाट्य प्रयोगातून मिळालेल्या नफ्यातून पंचऋषी सहकार मंडळ भातगाव तिसंग वाडीच्या वतीने जिल्हा परिषद शाळा भातगाव तिसंग न. 2 या शाळेला साउंड सिस्टीम वितरण करण्यात आली . या वितरण समारंभ प्रसंगी कार्यक्रमास अध्यक्ष म्हणून श्री प्रदीप कदम , कोसबी ग्रामपंचायत सरपंच सौ. संचिता सचिन डिंगणकर, कोसबीवाडी तंटामुक्ती अध्यक्ष श्री प्रकाश वेले, शाळा व्यवस्थापन कमिटी अध्यक्ष सौ. श्रावणी संदीप वेले पंचऋषी सहकार मंडळाचे उपाध्यक्ष श्री. रमेश वेलोंडे, पंचऋषी उन्नती मंडळाचे अध्यक्ष श्री. यशवंत डिंगणकर, नंदकुमार कदम, मनोहर कदम , मंगेश कदम, विजय कदम, प्रकाश महाकाळ, वाडीतील जेष्ठ शांताराम डिंगणकर, तानाजी डिंगणकर, रघुनाथ वेलोंडे, कृष्णा वेलोंडे, मंडळाचे सचिव अनंत डिंगणकर, सहसचिव प्रमोद वरवटकर, खजिनदार काशीराम डिंगणकर, सल्लागार सुभाष फावरे , मुख्यापक वसीम शेख, परशुराम डिंगणकर, प्रकाश वरवटकर, मंगेश डिंगणकर, सुरेश डिंगणकर, सुभाष वेलोंडे, प्रकाश वेलोंडे, रविंद्र वरवटकर, विनोद डिंगणकर , विश्वास डिंगणकर, विश्वास फावरे, मारुती वेलोंडे, सचिन डिंगणकर, राकेश वेलोंडे, संतोष वेलोंडे, अशोक वेलोंडे, विकास वेलोंडे आणि विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रम सुरुवात मंडळाचे सचिव अनंत डिंगणकर यांनी सर्व मान्यवरांचे स्वागत करून केली.अध्यक्ष निवड करून , छत्रपती शिवाजी महाराज्यांच्या फोटोला पुष्पहार अर्पण केला, सर्व मान्यवरांचा पुष्पगुच्छ देऊन सन्मान केला, सर्व मान्यवरांच्या व वाडीतील ग्रामस्थांच्या हस्ते शाळेचे मुख्यापक, शिक्षक आणि विद्यार्थी यांना साउंड सिस्टीम वितरीत करण्यात आले.
                           या कार्यक्रमा प्रसंगी सचिव अनंत डिंगणकर यांनी मंडळाबद्दल माहिती दिली . मंडळाच्या विविध उपक्रम बद्दल माहिती दिली , फेब्रुवारी 2025 रोजी शिवाजी नाट्यमदिर दादर येथील नाट्यकृती सादर केली होती नाट्यकृती सर्वांच्या सहकार्य ने हाऊसफुल्ल झाली त्या नाट्यकृती तुन मिळालेल्या नफ्यातून जिल्हा परिषद शाळा भातगाव तिसंग शाळेला साउंड सिस्टीम देण्यात आली. सर्व विद्यार्थ्यांना परीक्षा पॅड वाटप आले, मंडळाचे उपाध्यक्ष श्री. रमेश वेलोंडे यांनी सर्व विद्यार्थी यांना चांगले शिक्षण घेण्याचे उच्च शिक्षण , उच्च नोकरी आवाहन केले, व विद्यार्थ्यांनसाठी मंडळ सतत खंबीरपणे उभे राहिले असे आश्वासन दिले, सरपंच सौ. संचिता मॅडम यांनी मंडळाला शुभेच्छा दिल्या, श्री , नंदकुमार कदम, श्री प्रकाश वेले, मनोहर कदम या सर्वांनी मंडळाला शुभेच्छा दिल्या. त्या नंतर कार्यकाचे अध्यक्ष श्री प्रदीप कदम यांनी मनोगत व्यक्त केले. त्यांनी मंडळाला शुभेच्छा देत विद्यार्थ्यांना विविध विषयांवर कथे च्या स्वरूपात उदाहरण देत उच्च विचार , उच्च शिक्षण , उच्च नोकरी मिळवण्यासाठी , व गावात नवीन नवीन उद्योग उभे करून गावातील लोक गावात राहावे या साठी प्रयत्न करत असल्याचे , आणि शाळेचा पट वाढविण्यासाठी प्रयत्न करत असल्याचे सांगितले. अश्या प्रकारे कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनंत डिंगणकर यांनी केले व अध्यक्षाच्या परवानगीने कार्यक्रम संपविण्यात आला.

Comments