आमसभेत जि. प. आदर्श शाळा शिवणे नं. 2 शाळेचा आम. भास्करराव जाधव यांनी केला सन्मान
आबलोली
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा योजनेंतर्गत मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा टप्पा – २ अभियाना अंतर्गत झालेल्या स्पर्धेमध्ये शासकीय शाळा या गटात जिल्हा परिषद आदर्श शाळा शिवणे नं. 2 या शाळेने गुहागर तालुक्यातून प्रथम क्रमांक पटकावत शाळा रोख तीन लाख रुपयाच्या बक्षिसाची शाळा मानकरी ठरली आहे. त्याबद्दल आम. श्री भास्करराव जाधव आमदार गुहागर विधानसभा यांच्या हस्ते आमसभेत या शाळेचा सन्मान पूर्वक गौरवीण्यात आले आहे.
5 ऑगस्ट 2024 ते 4 सप्टेंबर 2024 या कालावधीमध्ये संपूर्ण राज्यात मुख्यमंत्री माझी शाळा , सुंदर शाळा हे अभियान राबविण्यात आले. या अभियाना अंतर्गत ( अ ) पायभूत सुविधा, (ब ) शासन ध्येय धोरण अंमलबजावणी, (क ) शैक्षणिक संपादणूक या तीन भागात शाळांचे १५० गुणांचे मूल्यमापन करण्यात आले. या सर्व घटकांमध्ये शाळेने उत्तम प्रदर्शन करत गुहागर तालुक्यातून शासकीय शाळा या गटात प्रथम क्रमांक पटकाविला.
गेल्यावर्षी शाळा गुहागर तालुक्यातून तृतीय क्रमांक पटकावत रोख एक लाख रुपयाच्या बक्षिसाची शाळा मानकरी ठरली होती. यापूर्वी शाळेला २०२०- २१ मध्ये आदर्श शाळा पुरस्कार ही मिळाला आहे. मुख्याध्यापक दिनेश काशिनाथ जाक्कर यांच्या नेतृत्वाखाली शाळेने उंच भरारी घेतली आहे. त्यांना शिक्षण सेवक श्री.प्रदीप हरिश्चंद्र बोंद्रे यांनी सहकार्य केले
गटशिक्षणाधिकारी श्री. रायचंद गळवे यांची प्रेरणा, विस्तार अधिकारी श्री. अविनाश शेंबेकर, केंद्र प्रमुख श्री. विश्वास खर्डे यांचे मार्गदर्शन, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष मनस्वी महेंद्र ठोंबरे, उपाध्यक्ष सुप्रिमी संजय जोशी , उपसरपंच सदानंद रामचंद्र जोशी, तंटामुक्ती अध्यक्ष शंकर जानू जोशी, सर्व शाळा व्यवस्थापन समिती आणि ग्रामस्थ यांचे लाभलेले सहकार्य यामुळे हे यश संपादन करण्यात आले आहे.
Comments
Post a Comment