आलापल्ली येथे वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न : पर्यावरण रक्षणासाठी पत्रकारांचा पुढाकार...

आलापल्ली येथे वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न : पर्यावरण रक्षणासाठी पत्रकारांचा पुढाकार...
आलापल्ली, ता. ७ ऑगस्ट :
राणी दुर्गावती हायस्कूल, आलापल्ली येथे तालुका पत्रकार संघटनेच्यावतीने वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. पर्यावरण संवर्धन आणि वृक्षसंवर्धन या उद्देशाने राबवण्यात आलेल्या या उपक्रमात पत्रकार, शिक्षकांचा उत्स्फूर्त सहभाग पाहायला मिळाला.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तालुका पत्रकार संघटनेचे अध्यक्ष ऋषी सुखदेवे होते. यावेळी डीडी न्यूजचे जिल्हा प्रतिनिधी ओमप्रकाश चुनारकर, राणी दुर्गावती विद्यालयाचे मुख्याध्यापक गजानन लोणबले, गणेश पाहापले, पत्रकार संघटनेचे सचिव रमेश बामनकर, उपाध्यक्ष आसिफ खान पठाण, सल्लागार सदस्य सदाशिव माकडे, सदस्य अनिल गुरूनुले, दिपक चुनारकर,अखिल कोलपपाकवार, विस्तारी गंगाधरीवार, मधुकर सडमेक आदी मान्यवर उपस्थित होते.

Comments