शरदचंद्रजी पवार अन्नतंत्रज्ञान महाविद्यालय, खरवते-दहिवली येथे एचएसीसीपी हे महत्वपूर्ण प्रशिक्षण उत्साहात संपन्न

आबलोली 
 चिपळूण तालुक्यातील शरदचंद्रजी पवार अन्नतंत्रज्ञान महाविद्यालय, खरवते-दहिवली येथे चतुर्थ वर्ष अन्नतंत्रज्ञान शाखेतील विद्यार्थ्यांसाठी महत्वपूर्ण असणारे एचएसीसीपी म्हणजेच अन्नप्रक्रीया उद्योगातील धोका विश्लेषण आणि गंभीर नियंत्रण बिंदु हे तीन दिवसीय प्रशिक्षण मोठ्या उत्साहात संपन्न झाले.या प्रशिक्षणास डाॅ.संजय ईंदाणी हे प्रमुख प्रशिक्षक म्हणून लाभले.अन्न प्रक्रिया हा भारतीय एक विस्तृत उद्योग असुन या मध्ये या प्रशिक्षणाचे अनन्यसाधारण महत्त्व आहे.यामध्ये अन्न उत्पादनाच्या प्रक्रियेतील संभाव्य धोके ओळखुन त्यावर नियंत्रण आणण्यासाठी गंभीर बिंदू निश्चित केले जातात तसेच हे संभाव्य धोके नियंत्रीत करण्यासाठी उपयुक्त असणार्या विविध उपाययोजना ई.चा समावेश आहे. या सर्व विषयांवर डाॅ.संजय ईंदाणी यांनी विद्यार्थ्यांना सखोल मार्गदर्शन केले.या प्रशिक्षणाच्या शेवटी सर्व सहभागी विद्यार्थ्यांना चिपळूण संगमेश्वर विधान सभा मतदार संघाचे आमदार व सह्याद्रि शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष शेखरजी निकम व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.सुनितकुमार पाटील यांचे हस्ते प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. प्राचार्य डॉ.सुनितकुमार पाटील यांनी या विषयी विद्यार्थ्यांशी संवाद साधत त्यांना संबोधित केले. अन्नतंत्रज्ञान शाखेची पदवी प्राप्त करुन विद्यार्थ्यी नामांकित कंपनीमध्ये नोकरी संदर्भात मुलाखती साठी जातात. या प्रशिक्षणाच्या प्रमाणपत्रावर आज वर अनेक विद्यार्थ्यांना कंपन्यांमध्ये उच्च पदावर नोकरी लागली असुन काही विद्यार्थ्यांनी स्वतःच्या उद्योगामध्ये याचा पुरेपूर वापर करत नामांकन मिळवले आहे. भविष्यामध्ये अन्न प्रक्रिया उद्योगाला कौशल्यपूर्ण विद्यार्थ्यी देण्यासाठी महाविद्यालय सज्ज आहे असे प्रतिपादन केले.या वेळी सह्याद्रि क्रिडा प्रबोधनीचे अध्यक्ष अनिरुद्ध निकम, डाॅ.संजय ईंदाणी, आदित्य शेट्टी व महाविद्यालयाचे सर्व प्राध्यापक वर्ग उपस्थित होते .हे प्रशिक्षण यशस्वी करण्यासाठी महाविद्यालयाचे प्राध्यापक विक्रांत साळवी व प्रा.संतोष कांबळे यांनी विशेष परिश्रम घेतले.

Comments