आदिवासी समाजाने मातृभाषेचे संरक्षण व संवर्धन करण्याची गरज :_डॉ. नरेश मडावी प्रसंगी दहावी, बारावी, गुणवंत व सेवानिवृत्तांचा सत्कार
आदिवासी समाजाने मातृभाषेचे संरक्षण व संवर्धन करण्याची गरज :_डॉ. नरेश मडावी
प्रसंगी दहावी, बारावी, गुणवंत व सेवानिवृत्तांचा सत्कार by-दिपक चुनारकर
आदिवासी समुदायाने आपल्या मातृभाषेचे संवर्धन व संरक्षण करण्याची काळाची गरज असल्याचे मत गोंडवाना विद्यापीठाचे इतिहास तज्ञ डॉक्टर नरेश मडावी यांनी स्थानिक कन्यका माता परमेश्वरी मंदिरात आयोजित जागतिक आदिवासी दिनाच्या कार्यक्रमानिमित्त मार्गदर्शक म्हणून मत व्यक्त केले.
कार्यक्रमाचे आयोजन ऑल इंडिया आदिवासी एम्प्लॉईज फेडरेशन, जय पेरसापेन बहुउद्देशीय आदिवासी समाज मंडळ, वीर बाबुराव स्मारक प्रतिष्ठान, गोटूल समिती, महिला बचत गट ,आदिवासी विद्यार्थी संघ यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आला.
कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. रमेश हलामी यांनी जागतिक आदिवासी गौरव दिवस हा कार्यक्रम म्हणजे आदिवासीतील विविध जाती पोट जातींना एका छत्राखाली आणणारे व्यासपीठ असल्याचे सांगितले.
विचार मंचावर उपस्थित उद्घाटक म्हणून माजी सरपंच गंगाराम कोडापे, तसेच डॉ. समता मडावी, प्रदीप सडमेक, सत्कारमूर्ती बुधाजी सिडाम, लक्ष्मीबाई कुडमेथे, सीताताई आलम, मातयाजी आत्राम, मधुकर मडावी, पितांबर कुळमेथे ,विलास सीडाम, विकास उईके, राहुल कोवे, राहुल पोरतेट आदी मान्यवरांनी उपस्थित राहून मार्गदर्शन केले.
प्रसंगी दहावी, बारावी व उच्च विद्या विभूषित गुणवंत विद्यार्थी तसेच सेवानिवृत्त व पदोन्नती मिळालेल्या मान्यवरांचा यावेळी सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमात विद्या आलम, सुहाना तोरे व पूरब मडावी यांनी स्वागत गीत सादर केले. यशस्वीतेसाठी सुंदरदास सडमेक, यादव मडावी, सामा सिडाम, अमृता कोडापे, बिच्छू वडे, पुष्पा सोयाम, संजय तोरे, विस्तारी तलांडे यांनी परिश्रम घेतले.
कार्यक्रमाचे संचालन महेश मडावी प्रास्ताविक बबलू सडमेक व आभार बापू तोरेम यांनी केले.
Comments
Post a Comment