आमदार किरण उर्फ भैय्या सामंत, प्रांताधिकारी जीवन देसाई यांच्या उपस्थितीत जवाहर नवोदय विद्यालय पडवे येथे विविध साहित्य वितरण सोहळ्याचे आयोजन
आबलोली
पालकमंत्री नाम. उदयजी सामंत राजापूर तालुक्याचे कार्य सम्राट आम. किरण उर्फ भैय्याशेठ सामंत यांच्या प्रयत्नाने व रत्नागिरी प्रांताधिकारी जीवन देसाई यांच्या सततच्या पाठपुराव्याने जेएसडब्ल्यू (जिंदाल) समूहाच्या सीएसआर फंडातून जवाहर नवोदय विद्यालय पडवे विद्यालयाला 300 फॅन, 10 इलेक्ट्रिक गिझर मंजूर झाले आहेत. या साहित्याच्या वितरण कार्यक्रमासाठी सन्माननीय आमदार भैय्याशेठ सामंत साहेब शनिवार दि. 09 ऑगस्ट 2025 रोजी विद्यालयात उपस्थित राहणार आहेत. तरी जास्तीत जास्त पालकांनी, माजी पिटीसी सदस्य, पालक, विद्यमान पिटीसी सदस्य यांनी आवर्जून उपस्थित रहावे.येत्या महिनाभरात सोलर प्लेट उपलब्ध होतील असेही साहेबांकडून सांगण्यात आले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचा गरम पाण्याचा प्रश्न त्वरित मार्गी लागेल. गेल्या 3 वर्षांपेक्षा अधिक काळ याचा पाठपुरावा सातत्याने पालकांकडून केला जात होता. सन्मा. पालकमंत्री महोदय व आमदार महोदयांच्या माध्यमातून हा प्रश्न मार्गी लागत आहे. त्याबद्दल विद्यार्थी पालक वर्गातून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.
Comments
Post a Comment