पालकमंत्र्यांचे नातूं बद्दलचे ते विधान चुकीचे - भाजपा जिल्हाध्यक्ष सतीश मोरे -निवडणुकीत भाजपाची ताकद दाखवूनच देऊ

आबलोली 
 जिल्हा नियोजन विभागाच्या निधी वाटपावरून माजी डॉ. आमदार विनय नातू खरं तेच बोलले आहेत प्रत्येक तालुक्याला सम प्रमाणात निधी मिळावा यासाठी ते बोलले मात्र पालकमंत्र्यांनी यावर मीडियासमोर कोण विनय नातू हे विधान केले ते चुकच आहे असे स्पष्ट मत भाजपा जिल्हाध्यक्ष सतीश मोरे यांनी गुहागर येथे झालेल्या पत्रकार परिषदेत केले सतीश मोरे पुढे म्हणाले नियोजनच्या निधीतील फरक डॉ. नातू यांनी माहिती अधिकारात समोर आणलेला आहे 
                       डॉ. नातू स्वतःला काही पाहिजे केव्हा कुठले पद पाहिजे म्हणून बोललेले नाहीत आपल्या गुहागर तालुक्याला निधी मिळावा ही त्यांची प्रामाणिकपणे भूमिका आहे विधानसभा निवडणुकीत शृंगारतळी येथील प्रचार सभेत तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डॉ. नातू यांना व्यासपीठावर जवळ बोलून त्यांच्यासारखा स्वच्छ प्रतिमेचा व त्यांना उमेदवारी डावलून सुद्धा उमेदवाराला सहकार्य करणारा नेता म्हणून त्यांचा जाहीर सभेत गौरव केला त्यामुळे डॉ. नातू यांच्यावर टीका करताना विचार केला पाहिजे असेही मोरे यांनी स्पष्ट सांगितले. येथील स्थानिक आमदारांनी डॉ. नातूंना तुच्छ म्हणून हिणवले मात्र त्यांचे मानसिक संतुलन बिघडले आहे त्यांना 2021 मध्ये मंत्रीपद मिळालेले नाही यावरून त्यांना मिळालेली वागणूक व तुच्छपणा दिसून आला गेले पंधरा वर्ष केवळ भाजपावरच आरोप करत आहेत तालुक्यातील खोतकी नष्ट केल्याचा आरोपाचे खंडन करताना मोरे म्हणाले ज्या डॉक्टर तात्यासाहेब नातूंनी शाळा काढून त्या संबंधित गावांना हस्तांतरित केल्या त्या त्यांनी स्वतःच्या नावावर करून आपली खोतकी गाजवली असती त्यामुळे खोतकीचा आरोप करणाऱ्यांनी स्वतःकडे बघावे असेही स्पष्ट केले 
                   गुहागर तालुक्यात भाजपाचे सर्वाधिक कार्यकर्ते आहेत त्यामुळे वरिष्ठांच्या निर्णयानुसार जसा लढण्याचा आदेश असेल तसे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत लढवून आमची ताकद दाखवू. राज्यातील अनेक नेते भाजपमध्ये दाखल होत आहेत रत्नागिरी जिल्ह्यातील कमळच दिसून येणार असून वरिष्ठांच्या आदेशानुसार निवडणूक लढवून प्रत्येक कार्यकर्त्याला लढण्याचे बळ मिळणार आहे असा विश्वासही सतीश मोरे यांनी व्यक्त केला या पत्रकार परिषदेला भाजपा तालुकाध्यक्ष अभय भाटकर, माजी तालुका अध्यक्ष निलेश सुर्वे, सरचिटणीस सचिन ओक, उपाध्यक्ष विनायक सुर्वे, आशिष विचारे, प्रांजली कचरेकर, अपूर्वा बारगोडे, शहराध्यक्ष नरेश पवार, संतोष सांगळे, श्रीकांत मोरे, विजय मसूरकर, रवी अवेरे, आदि. पदाधिकारी, कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते.

Comments