गुहागर हायस्कूलमध्ये शालेय वकृत्व स्पर्धा संपन्न(साकेत गुरव व स्वरा पाटीलने पटकावला प्रथम क्रमांक )

श्रीदेव गोपाळकृष्ण माध्यमिक विद्या मंदिर गुहागर विद्यालयात लोकमान्य टिळक पुण्यतिथी व अण्णाभाऊ साठे जयंती नुकतीच साजरी करण्यात आली.
        गुहागर विद्यालयात लोकमान्य टिळक पुण्यतिथी निमित्त शालेय वक्तृत्व स्पर्धा संपन्न झाली. सदरच्या स्पर्धेत प्राथमिक गटामध्ये वक्तृत्व स्पर्धेत साकेत समीर गुरव -५ वी - प्रथम क्रमांक , दुर्वा दशरथ नाटेकर - ७ वी - द्वितीय क्रमांक , निधी सुनिल रांजाणे - ६वी - तृतीय व सान्वी शैलेंद्र खातू ६वी हिने उत्तेजनार्थ क्रमांकाचे सुयश संपादन केले .
     तसेच माध्यमिक गटामध्ये स्वरा मंगेश पाटील ९वी - प्रथम क्रमांक , आर्या गणेश झगडे - द्वितीय क्रमांक तसेच सोहम समीर बावधनकर व श्रेयस ज्ञानेश्वर झगडे - ८वी यांनी तृतीय क्रमांक पटकावला .
सर्व सुयशस्वी विद्यार्थ्यांनी लोकमान्य टिळक यांच्याविषयी मनोगत व्यक्त केले तर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या विषयी शिक्षक पी.बी. जाधव यांनी मनोगत व्यक्त केले .
सुयशस्वी विद्यार्थ्याचे गुहागर एज्युकेशन सोसायटी व शालेय प्रशासनाच्यावतीने अभिनंदन करण्यात आले . सौ.यु.पी.कांबळे, सौ.जे. एम.माने , श्री.पी.बी.जाधव व सौ.एस.एस.ठाकूर यांनी स्पर्धेचे परिक्षण केले.

Comments