नाम. रामदासजी आठवले यांच्या प्रमुख उपस्थितीत लंडन मधील भारतीय उच्च आयुक्तालयाच्या प्रांगणात ७९ वा भारतीय स्वातंत्र्य दिन सोहळा उत्साहात साजरा
आबलोली
रिपब्लिकन पक्षाचे केंद्रीय मंत्री नाम. रामदासजी आठवले यांच्या प्रमुख उपस्थितीत लंडन मधील भारतीय उच्च आयुक्तालयाच्या प्रांगणात 79 वा भारतीय स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला.यावेळी रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष व केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री नाम.रामदासजी आठवले यांच्या प्रमुख उपस्थितीत भारतीय स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी नाम. रामदासजी आठवले यांच्या हस्ते जलतरणपटू अनन्या प्रसाद या मुलीचा सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.या सोहळ्यास लंडन मधील शेकडो भारतीय उपस्थित होते.भारतातून नाम. रामदासजी आठवले यांच्या समवेत त्यांच्या पत्नी सौ. सिमाताई आठवले, रिपाइंचे अविनाश कांबळे, सौ माधुरी अविनाश कांबळे, रिपब्लिकन बहुजन विद्यार्थी परिषदेचे चंद्रशेखर कांबळे आदी.मान्यवर उपस्थित होते.
Comments
Post a Comment