प्राथमिक शिक्षक असंतू तलांडी व गावकरी यांचे नाल्यात वाहून मृत्यू*@ त्यांना सोसायटी कडून सानुग्रह अनुदान
*प्राथमिक शिक्षक असंतू तलांडी व गावकरी यांचे नाल्यात वाहून मृत्यू*
@ त्यांना सोसायटी कडून सानुग्रह अनुदान
By-दिपक चुनारकर
अतिशय मूसळदार पाऊसाचे कहर संपूर्ण गडचिरोली जिल्ह्यात होत असून जि. प. प्रा.शाळा पल्ले पं.सं. अहेरी केन्द्र पेरमेली जि.गड. चे शिक्षक स्व. असंतू सोमा तलांडी वय ४५ रा.जूनावाही मन्नेराजाराम त.भामरागडचे रहीवाशी ते दररोज प्रमाणे आपल्या शाळेत जात असताना काल नाला ओलांडताना पाय घसरल्यामुळे तो नाल्यातील वाहता पाण्यात खाली पडलेल्याने शेवटी त्याला प्राण गमवावे लागले.
असलीच दूसरी घटना स्व. लालचंद कपिल शाई लाकडा रा.कोडपे त.भामरागड वय २० हा इसम आपले बैल खंडी नयनवाडी नाल्याच्या पलीकडे असलेले बैल आणण्याकरीता जात असताना पाण्याच्या प्रवाहामुळे कालच प्राण गमवावे लागले.
हे अहेरी विभागचे दरवर्षीप्रमाणे या वर्षी सूद्धा परंपरा चालू आहे. या वरून अहेरी उपविभाग सूरजागड सारखे देशव्यापी स्टील हब आहे. व घनदाट फॉरेस्ट आहे यांचे जे रॉयल्टी म्हणून करोडो रूपये जिल्हा नियोजन समिती लाजमा होते. ते रूपये क्षेत्राच्या विकासासाठी वापरणे अपेक्षित आहे परंतू अहेरी उपविभाग कोसो विकासापासून दूर आहे. इथे राहणारे आम नागरीक संभ्रम आहेत. एक मूका व बघ्याची भूमिका सूरू आहे रस्ते, विज, सिंचन , शिक्षण बद्दल राजकीय नेत्यांकडून आंदोलने होताना दिसते परंतू शासन प्रसाशन केंव्हा जागे होईल या वर प्रश्न चिन्ह निर्माण झाले. मृत शिक्षक कूंटूबाला शिक्षक पत संस्था अहेरी तर्फे श्री कैलाश पिंपळकर व्यवस्थापक , श्री रोहणकर सर संचालक श्री मूंजमकर सर संचालक व श्री बबलू सडमेक यांनी सानूग्रह निधी तात्काळ मृतक कूंटूब चे पत्नी श्रीमती नवरी यांना पोहचता केले.
Comments
Post a Comment