केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री आणि रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदासजी आठवले यांची अभिनेते भाऊ कदम यांनी घेतली सदिच्छा भेट
आबलोली
केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नाम. रामदासजी आठवले यांची अभिनेते भाऊ कदम यांनी नवी दिल्ली येथील कार्यालयात सदिच्छा भेट घेतली. या भेटीदरम्यान मराठी चित्रपट - नाट्य सृष्टीतील सध्याच्या घडामोडी समाजभिमुख विषयांना माध्यमातून पोहोचवण्याची गरज तसेच युवा कलाकारांसाठी कौशल्य विकास प्रशिक्षण या विषयावर सविस्तर चर्चा करण्यात आली. सामाजिक न्याय राज्यमंत्री आणि रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मान. रामदासजी आठवले यांनी भाऊ कदम यांच्या आगामी प्रकल्पांना मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या व त्यांच्या विनोद बुद्धीमुळे आणि समकालीन सामाजिक टिप्पणी मुळे प्रेक्षकांना नवी ऊर्जा व प्रेरणा मिळते आहे असे सांगून भाऊ कदम यांची स्तुती केली व शाब्बासकीची थाप पाठीवर मारली.
Comments
Post a Comment