हातखंबा शाळेजवळ टँकर पलटी
धक्का दायक
आता परत एकदा हातखंबा शाळेजवळ टँकर पलटी झाला!!
रत्नागिरी---
आज सकाळी पुन्हा एकदा हातखंबा येथे शाळेजवळ टँकर पलटी झाला असून त्यात एक जण महिला जखमी झाल्याचे समजते.
रत्नागिरीत नेमकं चाललय तरी काय हजारो लिटरचे टन गॅस भरलेले टँकर दिवसाढवळ्या रस्त्यावर पडत असतील किंवा कलंडत असतील तर याला जबाबदार कोण कारण राजरोसपणे दिवसा हे टँकर मोठ्या प्रमाणावर रत्नागिरीत जयगड इथून कोल्हापूरला जात असतात.
आज एकाच दिवसात सकाळी आठ ते नऊ वाजण्याची सुमारास निवळी व हातखंबा येथे टँकर पलटी झाल्याने एकच खळबळ उडाली आहे.
दरम्यान हातखंबा येथे शाळेजवळ पलटी झालेल्या टँकर मुळे ज्या दोन टपऱ्या होत्या त्याही टँकर मुळे मोडल्या असून त्यात एक महिला जखमी झाल्याचे समजते
दरम्यान टँकर पलटी होण्याचे प्रमाण गेल्या आठ दिवसात मोठ्या प्रमाणावर वाढले असून जर गॅस वाहून नेणारे टँकर जर वारंवार असे भर वस्तीत पडत असतील पलटी मारत असतील तर याला जबाबदार कोण असे विचारले जात
Comments
Post a Comment