"उत्कृष्ट तहसीलदार पुरस्कार" मिळाल्या बद्दल गुहागरचे तहसीलदार परिक्षित पाटील यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव

आबलोली
 प्रामाणिक पणे जनसेवा अंगीकारलेले प्रशासनातील उत्तम नेतृत्व यामुळेच आपत्ती काळात गुहागर तालुक्यात उत्कृष्ट नियोजन करून गुहागर तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी झटणारे गुहागर तालुक्याचे तहसीलदार परीक्षित पाटील यांना महसूल दिन दिनांक 1 ऑगस्ट 2025 रोजी जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांच्या शुभहस्ते उत्कृष्ट तहसीलदार म्हणून पुरस्कार देऊन गौरवण्यात आले गुहागरचे तहसीलदार परीक्षित पाटील यांना उत्कृष्ट तहसीलदार पुरस्कार मिळाल्याबद्दल आबलोली गावचे सामाजिक कार्यकर्ते व ऍड. प्रमेय आर्यमाने, उद्योजक ओंकार बाईत यांनी अभिनंदन केले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. गुहागरचे तहसीलदार परीक्षित पाटील यांना उत्कृष्ट तहसीलदार पुरस्कार मिळाल्याबद्दल गुहागरचे तहसीलदार परीक्षित पाटील यांच्यावर गुहागर तालुक्यातील जनतेकडून अभिनंदनाचा वर्षाव करण्यात येत आहे.

Comments