स्वातंत्र्यदिनी खोडदे मोहिते वाडी शाळेत सूर्या ग्रुप संघटनेच्या वतीने विद्यार्थ्यांना शालेय बॅग वाटप कार्यक्रम उत्साहात संपन्न

आबलोली 
 गुहागर तालुक्यातील खोडदे मोहिते वाडी येथील जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा मोहिते वाडी या शाळेत स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून सूर्या ग्रुप संघटना खोडदे मोहिते वाडी या संघटनेकडून शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना शालेय बॅग वाटप कार्यक्रम मान्यवरांचे उपस्थितीत उत्साहात झाला संपन्न झाला.
           " वारसा शिक्षणाचा, प्रयत्न प्रोत्सानाचा"
 या विश्वासाने प्रेरित होऊन सूर्या ग्रुप संघटना खोडदे मोहिते वाडी या संघटनेने समाजाचे आपण देणे लागतो या प्रमुख उद्देशाने या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमाला शाळेतील सर्व शिक्षक शिक्षण समिती अध्यक्ष वाडीतील वरिष्ठ मान्यवर ग्रामस्थ महिला पालक बहुसंख्येने उपस्थित होते शिक्षक व मान्यवरांनी यावेळी सूर्या ग्रुप या सामाजिक संस्थेचे भरभरून कौतुक केले. 
                          यावेळी व्यासपीठावर वाडी प्रमुख दिनेश मोहिते, सामाजिक कार्यकर्ते काशिनाथ मोहिते, काशीराम मोहिते, विकास मोहिते, संदीप मोहिते, नितीन मोहिते, ग्रामपंचायत सदस्य सौ शुभांगी डिंगणकर, मुख्याध्यापक संतोष भोसले, माजी मुख्याध्यापक अनंत पागडे, सौ. रश्मी सुर्वे, अंगणवाडी सेविका अक्षता मोहिते, मदतनीस तनिष्का मोहिते, सूर्या ग्रुपचे कार्यकर्ते जगदीश डिंगणकर, चंद्रकांत तांबे, पारस तांबे आदी. उपस्थित होते.

Comments