रिपाइं (आठवले)चे मुंबई प्रदेश जनरल सेक्रेटरी आयु. विवेक पवार यांच्या हस्ते सांताक्रुज येथे ध्वजारोहण आणि विद्यार्थ्यांना शालेय वस्तूंचे वाटप
आबलोली
विश्वरत्न,विश्वभूषण, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापन केलेल्या बौद्धजन पंचायत समिती शाखा क्रमांक 153 आणि शाखा क्रमांक 433 यांच्या संयुक्त विद्यमाने सांताक्रुज पश्चिम भीमवाडा येथे स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून सरस्वती शिक्षण संस्था संचलित माता रमाई आंबेडकर जुनिअर कॉलेज चिपळूणचे संस्थापक अध्यक्ष आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले या पक्षाचे मुंबई प्रतीचे सरचिटणीस आयुष्यमान विवेक गोविंदराव पवार यांचे शुभ हस्ते ध्वजारोहण आणि शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप हा कार्यक्रम उत्साहात आणि जल्लोषात संपन्न झाला. आयु. विवेक गोविंदराव पवार हे बौद्धजन पंचायत समिती मुंबई या संस्थेचे गेली 35 वर्ष विश्वस्त आहेत तसेच रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले या पक्षाचे मुंबई प्रदेशचे जनरल सेक्रेटरी म्हणून विवेक गोविंद पवार यांची उल्लेखनीय कामगिरी आहे.
Comments
Post a Comment