पेरमिली पोलीस स्टेशनचा तिहेरी उत्सव – संस्कृती, स्नेह आणि संवर्धन
पेरमिली पोलीस स्टेशनचा तिहेरी उत्सव – संस्कृती, स्नेह आणि संवर्धन
पेरमिली, दि. 09 ऑगस्ट – जागतिक आदिवासी दिनाच्या निमित्ताने पेरमिली उप पोलीस स्टेशनने एकाच दिवशी संस्कृतीचे जतन, स्नेहबंधाची जोपासना आणि पर्यावरण संवर्धन या तीन महत्त्वाच्या संकल्पांना मूर्त रूप देणारा तिहेरी उत्सव साजरा केला.
सकाळी गावातून निघालेल्या जनजागृती रॅलीत पोलीस कर्मचारी, CRPF व SRPF जवान, विद्यार्थी, शिक्षक आणि ग्रामस्थांचा उत्स्फूर्त सहभाग दिसून आला. “संस्कृती जपा, शिक्षण घ्या, भाऊबहीणीचा स्नेह जोडा” अशा घोषणांनी गावाचा गजर झाला.
शासकीय माध्यमिक आश्रम शाळेत निबंध, चित्रकला आणि रेला नृत्य स्पर्धांत विद्यार्थ्यांनी आपली सर्जनशीलता खुलवली. विजेत्यांना प्रमाणपत्रे आणि बक्षिसे देऊन गौरवण्यात आले.
विशेष आकर्षण ठरलेला ‘राखी विथ खाकी’ उपक्रमात विद्यार्थिनींनी पोलीस बांधवांना राखी बांधत त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त केली.
यानंतर उप पोलीस स्टेशन परिसरात हरितवृक्ष मोहिमेअंतर्गत विविध प्रकारच्या झाडांचे वृक्षारोपण करण्यात आले. पोलीस अधिकारी, जवान, शिक्षक व विद्यार्थ्यांनी सामूहिकपणे पर्यावरण संवर्धनाचा संदेश दिला.
कार्यक्रमाला मुख्याध्यापक माऊलीकर सर, अधीक्षक भोये सर, प्रभारी अधिकारी दीपक सोनुने, PSI महाजन, CRPF PI सिंग, PSI कुटे, जिल्हा पोलीस, SRPF व CRPF जवान, तसेच शिक्षकवृंद उपस्थित होते. मान्यवरांनी विद्यार्थ्यांना कायदा-सुव्यवस्था, शिक्षणाचे महत्त्व, पर्यावरण संवर्धन आणि आदिवासी संस्कृतीचे जतन याविषयी मार्गदर्शन केले.
उप पोलीस स्टेशन पेरमिली तर्फे सर्व सहकार्यकर्त्यांचे आभार मानून हा तिहेरी उत्सव यशस्वीपणे पार पडला.
Comments
Post a Comment