खोडदे गावाच्या तंटामुक्त समिती अध्यक्षपदी राजेंद्र अनंत साळवी

आबलोली 
 गुहागर तालुक्यातील खोडदे गावचे सुपुत्र आणि सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र अनंत साळवी यांची खोडदे गावच्या तंटामुक्ती समिती अध्यक्षपदी सर्वानुमते अविरोध निवड झाल्याने राजेंद्र साळवी यांच्यावर अभिनंदनचा वर्षाव होत आहे. सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र साळवी यांचे खोडदे ग्रामपंचायतच्या सरपंच कुमारी पूजा गुरव, ग्रामपंचायत सदस्य नाना साळवी, आबलोली - खोडदे विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन राजेंद्र पंढरीनाथ साळवी, सामाजिक कार्यकर्ते विलास गुरव, विनायक गुरव, संतोष गुरव, ग्रामपंचायत कर्मचारी नितीन मोहिते,वैभव निवाते यांनी अभिनंदन केले असून राजेंद्र अनंत साळवी यांच्यावर खोडदे पंचक्रोशी मधून विविध सामाजिक, धार्मिक, राजकीय, स्तरातून अभिनंदनचा वर्षाव होत आहे.

Comments