माहितीचा अधिकार कार्य कर्ता महासंघ महाराष्ट्र राज्य चे राजापूर,लांजा तालुक्याचे वतीने लाक्षणिक उपोषण*

*माहितीचा अधिकार कार्य कर्ता महासंघ महाराष्ट्र राज्य चे राजापूर,लांजा तालुक्याचे वतीने लाक्षणिक उपोषण*

*माहितीचा अधिकार कार्य कर्ता महासंघ महाराष्ट्र राज्य चे रत्नागिरी जिल्हाध्यक्ष मनोहर गुरव यांची उपस्थिती.*

*रत्नागिरी जिल्ह्यातून अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते यांचा उपोषणास मोठा सहभाग*

*संबंधित अधिकाऱ्यांनी यांनी दुपारी उपोषणस्थळी येऊन सदर मागण्या मान्य केल्याचे पत्र दिले.त्यानुसार सदर उपोषण जोपर्यंत कार्यवाही होणार नाही तोपर्यंत  तात्पुरते स्थगित करण्यात आले*

राजापूर लांजा तालुक्यातील  सार्वजनिक बांधकाम विभागाने  रस्त्याचा सर्व्हे चुकीच्या पद्धतीने केलेला असून राजापूर लांजा विभागाचे अधिकारी यांनी शासनाची तसेच जनतेची दिशा भूल तसेच फसवणूक केलेली आहे.त्यांच्या वर फौजदारी गुन्हे दाखल करावेत.
भारती एअरटेल कंपनी लिमिटेड पुणे व कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग रत्नागिरी यांनी शर्ती व अटीचा भंग झाला असल्यास अट क्र.24 प्रमाणे अतिरिक्त केलेल्या खोद कामाचे 5000/- प्रती मीटर प्रमाणे दंड आकारण्याबाबतच्या मागण्या करण्यात आल्या होत्या.
त्यानुसार संबंधित अधिकारी यांनी दुपारी उपोषणस्थळी येऊन   आपल्या मागण्या मान्य केल्याचे पत्र दिले असता सदर उपोषण जोपर्यंत कार्यवाही होत नाही तोपर्यंत तूर्तास उपोषण मागे घेण्यात आले असल्याचे माहितीचा अधिकार कार्यकर्ता महासंघ महाराष्ट्र राज्य चे रत्नागिरी जिल्हा सचिव पद्भनाभ कोठारकर यांनी सांगितले. उपोषण दरम्यान महासंघाचे जिल्हाध्यक्ष,फ्रेश न्यूजचे उपसंपादक,तसेच सामाजिक कार्यकर्ते मनोहर गुरव यांनी उपोषण कर्त्यांना मार्गदर्शन केले.तसेच रत्नागिरी जिल्ह्यात अधिकारी वर्गाचा जनतेवर होणारा अन्याय,फसवणूक, मनमानी कारभार,विकासाच्या नावाखाली आणलेल्या योजना ह्या जनतेसाठी नसून विशिष्ट अधिकारी,व आपल्या मर्जीतील विशिष्ठ लोकांसाठी आणल्या असून त्यामध्ये जल जीवन मिशन योजनेंतर्गत झालेला भ्रष्टाचार,निकृष्ट दर्जाचे रस्ते,आहेत.
      याबाबत यावेळी लांजा तालुकाध्यक्ष सौ साक्षी पराडकर,  उपाध्यक्ष जितेंद्र चव्हाण,तसेच संगमेश्वर तालुक्यातील सुनिल करंडे,प्रमोद रेवणे,प्रसाद कांगणे प्रकाश खांडेकर,लता करंबेळे अरविंद मोहिते,आदीपदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपोषणास उपस्थित होते.

Comments