तानबोडी येथील शिक्षण परिषदेत अविस्मरणीय सेवापूर्ती कार्यक्रमातून प्रेरणा

तानबोडी येथील शिक्षण परिषदेत अविस्मरणीय सेवापूर्ती कार्यक्रमातून प्रेरणा 
दिपक चुनारकर 
आज दिनांक 31 जुलै 2025 रोजी मासिक शिक्षण परिषदेचे आयोजन करण्यात आले. अतिशय शिस्तीत शिक्षक गणवेशात 100 टक्के शिक्षकांची उपस्थिती दर्शविली शिक्षण परिषदेचे उद्घाटन मा. दादाजी मडावी, ग्राम. सदस्य ह्याच्या हस्ते करण्यात आले. नंतर लगेच शिक्षण परिषदेला खुर्शीद शेख यांच्या आदर्श शिक्षकाच्या प्रेरणादायी तासिकेला सुरवात झाली. त्यानंतर श्री. रमेश चांदेकर यांचे निपुण भारतवर मार्गदर्शन, कु. गझगंटीवार यांनी शिष्यवृत्ती परीक्षा नियोजन ह्या विषयावर उत्कृष्ट मार्गदर्शन व चर्चा केली.
       त्यानंतर नानाजी कोठारीचे सेवानिवृत्तीपर सहपरिवार सत्कार करण्यात आले. त्यांच्या विषयी कोडपे, रमेश चांदेकर , खुर्शीद शेख , संजय कुमरे , निशिकांत करमे केंद्र प्रमुख ह्यांनी आपले मनोगत मांडले.
       ह्या वेळी सर्व शिक्षक अतिशय भाऊक झाले. त्या नंतर कोठारी ह्यांचे सुपुत्र व सहचरणीने त्यांच्या विषयी अतिशय मार्मिक मत मांडले. शेवटी नानाजी कोठारी सरांनी आपल्या शिक्षकी सेवेच्या जीवन प्रवासाचे अगदी जीवंत वर्णन आपल्या मनोगतातून व्यक्त केले...
       त्यांचा हा शिक्षकी प्रवास सर्वांना प्रेरणादायी ठरला. 
ह्या सेवापूर्ती समारंभ मध्ये नानाजी कोठारी परिवाराला सर्व शिक्षकांनी शुभेच्छा व केंद्राच्या वतीने भेटवस्तू देण्यात आली. ह्या कार्यक्रमाचे आयोजन व नियोजन मा. निशिकांत करमे केंद्रप्रमुख ह्यांच्या मार्गदर्शनाखाली केंद्रातील सर्व मुख्याध्यापक व सर्व शिक्षकांनी सुव्यवस्थित पद्धतीने केले.
      सदर कार्यक्रमाचे संचलन गणेश सुर्तेकर ह्यांनी केले. ह्या प्रसंगी शाळा व्यवस्थापन समिती सदस्य व ग्रामस्थ उपस्थीत होते. आज एक अविस्मरणीय सेवापूर्ती सोहळा सर्वांच्या सहकार्याने पार पडला हे विशेष .

Comments