विकास कामां संदर्भात 29 रोजी शुक्रवारी आमदार भास्करशेठ जाधव यांची खोडदे सहाण सभागृह येथे नागरिकांच्या भेटीसाठी उपस्थिती

आबलोली 
 उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाच्या जिल्हा परिषद पडवे गटातील सर्व पदाधिकारी, शाखाप्रमुख, महिला आघाडी, युवा सेना यांचे बरोबर ग्रामस्थांच्या - नागरिकांच्या भेटीसाठी शुक्रवार दिनांक 29 ऑगस्ट 2025 रोजी गुहागरचे आमदार भास्करशेठ जाधव हे गुहागर तालुक्यातील खोडदे आठवडा बाजार येथील श्री. नवलाई देवीच्या सहाण सभागृह येथे दुपारी 02:30 या वेळेत विकास कामाबाबत समोरासमोर चर्चा करणार आहेत.तरी पडवे जिल्हा परिषद गटातील सर्व गावातील ग्रामस्थांनी विकास कामासंदर्भात चर्चा करण्यासाठी वेळेत उपस्थित रहावे अशी विनंती उबाठाचे तालुकाप्रमुख सचिन बाईत, तालुका सचिव विलास गुरव, उपतालुका प्रमुख काशिनाथ मोहिते, विभाग प्रमुख रवींद्र आंबेकर, शरद साळवी यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केली आहे.

Comments