आम.भास्कर जाधव यांच्या नुतीकरण केलेल्या कार्यालयाचे सौ. सुवर्णाताई जाधव यांच्या हस्ते उदघाटन उत्साहात संपन्न

शिवसेना नेते,आमदार भास्करराव जाधव यांचे नूतनीकरण केलेले चिपळूण येथील कार्यालयाचे त्यांच्या सुविद्य पत्नी सौ. सुवर्णताई भास्करराव जाधव यांच्या शुभ हस्ते फित कापून उदघाटन जल्लोषात करण्यात आले. तर केबिनचे उदघाटन राष्ट्रवादीचे नेते श्री. प्रशांत यादव यांच्या हस्ते फित कापून करण्यात आले. यावेळी मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते पदाधिकारी व सर्वपक्षीय नेत्यांनी शुभेच्छा देण्यासाठी कार्यालयामध्ये गर्दी केली होती.सौ.सुवर्णाताई जाधव यांचा वाढदिवसही नविन कार्यालयात केक कापून साजरा करण्यात आला.यावेळी आम. भास्करराव जाधव यांनी गाणे म्हणून सौभाग्यवती सौ. सुवर्णाताई जाधव यांना केक भरवला.

Comments