जि.प.केंद्रशाळा आबलोली येथे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक जयंती महोत्सव आणि कृषी दिना निमित्त रानभाज्यांचे प्रदर्शन आणि चित्रकला स्पर्धा उत्साहात संपन्न

जिल्हा परिषद केंद्रशाळा आबलोली नं. १ आणि डॉ.बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ अंतर्गत चिपळूण तालुक्यातील शरदचंद्रजी पवार उद्यानविद्या महाविद्यालय खरवते - दहिवली या महाविद्यालयाच्या कृषी दुतांच्या संयुक्त विद्यमाने गुहागर तालुक्यातील आबलोली येथील जिल्हा परिषद केंद्र शाळा आबलोली नं. १ येथे कृषी तज्ञ व माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या जयतींचे आणि कृषी दिनाचे औचित्य साधून रानभाज्यांचे भव्यदिव्य प्रदर्शन आणि चित्रकला स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. 
                    या रानभाज्यांचे भव्यदिव्य प्रदर्शनाला निर्मल ग्रामपंचायत आबलोलीच्या सरपंच सौ. वैष्णवी वैभव नेटके, ग्रामपंचायत अधिकारी बाबूराव सुर्यवंशी,तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष आप्पा कदम, दत्ताराम कदम,पाणलोट समितीचे सचिव नितेश पांचाळ, ग्रामपंचायत सदस्य ऋषीकेश बाईत, संजय कदम, सौ. रुपाली कदम, रिगल कॉलेज शृंगारतळीच्या प्राध्यापिका सोनाली मिरगल, सोनल पाटील, वृणाल बेर्डे, विक्रम खैर,यांचेसह रिगल कॉलेजचे राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे ४० विद्यार्थी, मुख्याध्यापिका ममता जाधव,अंगणवाडी सेविका प्रिया कदम,आशा स्वयंसेविका विशाखा कदम सानिद्या रेपाळ आदी. मान्यवरांसह आबलोली गावातील ग्रामस्थांनी या रानभाज्यांचे भव्यदिव्य प्रदर्शनाला भेट देऊन माहिती जाणून घेतली
                         यावेळी जिल्हा परिषद केंद्र शाळा आबलोली नं. १ या केंद्र शाळेचे मुख्याध्यापक राजदत्त कदम, सहकारी शिक्षक गौतम लोणारे, सौरभ कटनाक तसेच शरदचंद्रजी पवार उद्यानविद्या महाविद्यालय खरवते - दहिवली या विद्यालयाचे कृषी दुत रुपेश जाधव, अजित घोगरे, ओम चिखले, निखिल गडगे, मेघराज मिंड, वैभव गायकवाड, ओंकार बिबे यांनी या सर्व मान्यवरांचे स्वागत करुन रानभाज्यांचे भव्यदिव्य प्रदर्शन आणि रंगभरण स्पर्धा यशस्वी केली.

Comments