चिपळूण तालुका बौद्धजन हितसंरक्षक समिती चिपळूण या धम्म संघटनेतर्फे विद्यार्थी गुणगौरव सोहळा उत्साहात संपन्न

शेवटच्या बाकावर बसलेल्या विद्यार्थ्याला पुढच्या पहिल्या दुसऱ्या बाकावर बसलेल्या विद्यार्थ्याने हलक्यात घेऊ नये. कारण या दोघांपैकी त्याचा स्वतःवर पूर्णत:आत्मविश्वास असतो आणि हेच त्याच्या यशाचे गमक असते.करिअर हे प्रत्येक विद्यार्थ्याच्या आवडीवर आणि निवडीवर अवलंबून असते असे प्रतिपादन सह्याद्री पॉलिटेक्निकल सावर्डे (चिपळूण) येथे ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर दिनेश खानविलकर यांनी केले.
                   चिपळूण तालुका बौद्धजन हितसंरक्षक समिती, चिपळूण आणि शिक्षण समिती यांच्या वतीने इयत्ता दहावी, बारावी, पदवी व पदवीत्तर उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा येथील विश्वभूषण डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक भवनात पार पडला. यावेळी सुमारे १०० हून अधिक विद्यार्थ्यांचा ,पदवीधरांचा प्रमुख मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. याप्रसंगी विद्यार्थ्यांना संबोधित करताना दिनेश खानविलकर पुढे म्हणाले. आज विविध प्रकारातील व्यावसायिक अभ्यासक्रमाचे अनेक पर्याय तसेच शासनाच्या हितोपयोगी शिष्यवृत्ती सुविधा उपलब्ध आहेत. म्हणून कोणत्याही शाखेतल्या विद्यार्थ्यांनी शिक्षणापासून वंचित राहू नये. पुढे त्यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुस्तक वाचनांचे संदर्भ देताना प्रगल्भ बुद्धिमत्तेचे आणि अथक परिश्रमाचे जागतिक किर्तीचा बहुमान प्राप्त झालेले लिखित संविधान हे भारताला कसे भूषणवह ठरले आहे. यावर आपले विचार व्यक्त करून सभागृहाला मंत्रमुग्ध केले. सदर कार्यक्रम संस्थेचे अध्यक्ष चंद्रकांत सावंत यांच्या अधिपत्याखाली संपन्न झाला. स्वागताध्यस्थानी शिक्षण समितीचे अध्यक्ष विलास सकपाळ होते. विचारपीठावर शिवसेना शहर प्रमुख उमेश सकपाळ , कपिल शिर्के, उपाध्यक्ष नाना सावंत, सहचिटणीस तुकाराम सकपाळ, प्रमोद कांबळे, धम्म कमिटीचे अध्यक्ष मनोहर कदम, न्यायदान कमिटीचे अध्यक्ष आनंद सकपाळ, माजी उपाध्यक्ष, साहित्यिक व डॉ. बाबासाहेब आंबेडकर वाचनालय , चिपळूणचे अध्यक्ष राष्ट्रपाल सावंत, प्राध्यापक संसारे , मुंबईचे सरचिटणीस मंगेश जाधव, अनंत जाधव , श्रीधर जाधव, मनिष मोहिते आदींची प्रमुख उपस्थिती लाभली होती. 
         या भव्य दिव्य कार्यक्रमाकरिता चिपळूण तालुक्यातील बौद्धजन हितसंरक्षक समिती, चिपळूण या मातृसंस्थेतील ग्रामीण विभागातील अनेक गावातील पदाधिकाऱ्यांनी ,सदस्यांनी, कार्यकर्त्यांनी बहुसंख्येने उपस्थिती दर्शवली होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संस्थेचे सरचिटणीस , युवा पत्रकार संदेश पवार यांनी केले विद्यार्थ्यांमधील उत्साह आणि पालकांच्या चेहऱ्यावरील समाधान या कार्यक्रमाची जणू पोचपावती होती. पुढील वर्षी या वर्षाच्या गुणापेक्षा अधिकाधिक कोण आपल्याला कसे प्राप्त होतील. या समवेत कॉलेज प्रवेशासंबंधी आणि करिअर संबंधित विषयाची चर्चा होती. या आनंदमय सोहळ्याला या संस्थेचे माजी चिटणीस रमाकांत सकपाळ, सामाजिक कार्यकर्ते राजू जाधव, राजहंस पतसंस्थेचे संचालक सुनील गमरे, कुटरे विभागाचे अध्यक्ष प्रकाश कदम ,२७ गाव विभागाचे अध्यक्ष सुधाकर पवार, सावर्डे विभागाचे अध्यक्ष काशिराम कदम गुरुजी, वहाळ विभागाचे अध्यक्ष अरुण पवार, यशसिद्धी माजी सैनिक संघटनेचे अध्यक्ष सुभेदार भाऊ पवार, निवृत्त शासकीय अधिकारी अरुण जाधव, माजी मुख्याध्यापक संजय मोहिते, युवा मुख्याध्यापक रोहित जाधव, बौद्धाचार्य प्रभाकर सकपाळ, आरपीआय (आठवले गट) तालुकाध्यक्ष प्रशांत मोहिते, भिले गावचे उपसरपंच उमेश सकपाळ व मातोश्री लक्ष्मीबाई कदम स्मृती मंच, खेरशेत या संस्थेचे मुख्य प्रवर्तक संजय शांताराम कदम तसेच चिपळूण तालुक्यातील ग्रामीण संघटनेचे कार्यकर्ते, मान्यवरांनी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली.

Comments