प्रधानमंत्री पीक विमा नोंदणीसाठी ३१ जुलै २०२५ पर्यंत मुदत - प्रधानमंत्री पिक विमा योजनेचा लाभ घेण्याचे कृषी विभागाचे आवाहन
गुहागर तालुक्यातील सर्व शेतकरी बांधवांना सूचित करण्यात येते की, प्रधानमंत्री पीक विमा योजना (PMFBY) खरीप हंगाम २०२५ साठी नोंदणी सुरू झाली असून, याची अंतिम मुदत ३१ जुलै २०२५ आहे. रत्नागिरी जिल्ह्यासाठी भारतीय कृषी विमा कंपनी मुंबई (ईमेल: pikvima@aicofindia.com) ही पीक विमा कंपनी नियुक्त करण्यात आली आहे.तरी गुहागर तालुक्यातील शेतकरी यांनी भात आणि नागली या अधिसूचित पिकांसाठी विमा संरक्षण मिळवू शकतात.यासाठी शेतकऱ्यांनी दिनांक ३१ जुलै पर्यंत या प्रधान मंत्री पीक विमा योजनेचा लाभ घ्यावा असे जाहीर आवाहन गुहागरचे तालुका कृषी अधिकारी अमोल शिरसागर, उपविभागीय कृषी अधिकारी शिंदे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे
भात पिकाकरिता प्रती हेक्टरी विमा संरक्षित रक्कम ६१०००/असून याकरिता शेतकरी विमा हप्ता रक्कम ४५७.५० रुपये आहे.तसेच नाचणी पिकाकरिता प्रती हेक्टरी विमा संरक्षित रक्कम ३५०००/असून याकरिता शेतकरी शेतकरी विमा हप्ता रक्कम ८७.५० रुपये आहे
*पीक विमा अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे*
पीक विमा योजनेसाठी अर्ज करताना खालील कागदपत्रे आवश्यक असतील:
* फार्मर आयडी (एग्रीस्टॅक क्रमांक)
* पीक नोंद असलेला ७/१२ उतारा
* आधारकार्ड प्रत
* बँक पासबुक प्रत
* पेरणी स्वयंघोषणापत्र
*पीक विमा अर्ज नोंदणी कशी कराल?*
शेतकरी खालीलपैकी कोणत्याही पर्यायाद्वारे आपला पीक विमा अर्ज नोंदणी करू शकतात:
* आपले सरकार सुविधा महा ई-सेवा केंद्र (CSC)
* नजीकच्या राष्ट्रीय बँक, जिल्हा मध्यवर्ती बँक किंवा खाजगी बँकेच्या शाखांमध्ये
* http://pmfby.gov.in या अधिकृत लिंकवर स्वतः ऑनलाइन अर्ज करू शकता.
कृषी विभागामार्फत सर्व शेतकरी बांधवांना आवाहन करण्यात येते की, त्यांनी ३१ जुलै २०२५ पूर्वीच आपला पीक विमा भरून घ्यावा.पीक विमा संदर्भात काही अडचणी उद्भवल्यास, शेतकरी बांधवांनी संबंधित गावाचे सहाय्यक कृषी अधिकारी, उप कृषी अधिकारी, मंडळ कृषी अधिकारी किंवा तालुका कृषी अधिकारी, गुहागर यांच्याशी संपर्क साधावा असे जाहिर आवाहन गुहागरचे तालुका कृषी अधिकारी अमोल शिरसागर, उपविभागीय अधिकारी शिंदे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.
Comments
Post a Comment