पाटपन्हाळे विद्यालयातर्फे गुणवंतांचा सत्कारमिहिर पुरोहित व नेहा निवाते ठरले शिष्यवृत्तीधारक
शैक्षणिक वर्ष २०२४-२०२५ वर्षातील इयत्ता पाचवी व आठवी शिष्यवृत्ती परीक्षेचा अंतिम निकाल नुकताच जाहीर झाला असून गुहागर तालुक्यातील न्यू इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय पाटपन्हाळे विद्यालयाने शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये सुयश संपादन केले आहे. इयत्ता पाचवी शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये मिहिर समीर पुरोहित याने सर्वसाधारण गटात १०२ व्या क्रमांकाचे सुयश संपादन केले आहे. तसेच इयत्ता आठवी शिष्यवृत्ती परीक्षेत नेहा संदीप निवाते हिने ग्रामीण सर्वसाधारण गटात ८१ वा क्रमांक संपादन करून शिष्यवृत्ती धारण केली आहे.तसेच डॉक्टर होमी भाभा बाल वैज्ञानिक स्पर्धेत शैक्षणिक वर्ष २०२४- २५ मध्ये इयत्ता १० मधील विद्यार्थिनी कुमारी मृण्मयी दत्ताराम जाधव ही उत्तीर्ण झाल्याबद्दल प्रशस्तीपत्र व पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन करण्यात आले.इयत्ता पाचवी व आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेसाठी बहुसंख्य विद्यार्थी प्रविष्ठ झाले होते. सदरच्या इयत्ता पाचवी व आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेतील शिष्यवृत्तीधारक विद्यार्थी मिहिर पुरोहित व नेहा निवाते तसेच मृण्मयी जाधव व मार्गदर्शक शिक्षक यांचा मुख्याध्यापिका सौ.एस.एस.चव्हाण , पर्यवेक्षक जी.डी.नेरले व शिक्षकवृंद यांच्या उपस्थितीत पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
Comments
Post a Comment