जि.प.च्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती. वैदही रानडे यांचे आबलोली येथे जंगी स्वागत

गुहागर तालुक्यातील निर्मल ग्रामपंचायत आबलोलीच्या वतीने सरपंच सौ. वैष्णवी वैभव नेटके यांनी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती. वैदही रानडे यांचे आबलोली गावाच्या आणि ग्रामपंचायतीच्या वतीने आबलोली येथील गुरुप्रसाद आचार्य यांच्या निवासस्थानी जंगी स्वागत केले. 
                      जि. प. च्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती. वैदही रानडे या गुहागर दौ-यावर जात असताना आबलोली येथील गुरुप्रसाद आचार्य यांच्या खानावलीमध्ये न्याहारी करण्यासाठी थांबल्या असता सरपंच सौ. वैष्णवी वैभव नेटके यांनी त्याचे जंगी स्वागत केले 
                          यावेळी जि. प. च्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती. वैदही रानडे यांचे सोबत मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. जाधव, ग्रामीण पाणी पुरवठा कार्यकारी अभियंता श्रीमती. मयुरी पाटील, गुहागरचे गटविकास अधिकारी श्री. शेखर भिलारे, सहाय्यक गटविकास अधिकारी भांड, बांधकाम विभागाचे उप अभियंता सळमके, श्री. छत्रे यांचेसह अधिकारी,कर्मचारी उपस्थित होते या सर्वांचे सरपंच सौ वैष्णवी वैभव नेटके यांनी जंगी स्वागत केले.

Comments