अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते तहसील मध्ये वृक्षारोपण

अति.जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते तहसील मध्ये वृक्षारोपण 
दिपक चुनारकर (गडचिरोली)
राज्यातील वनाच्छदनाची टक्केवारी वाढविण्यासाठी "हरित महाराष्ट्र, समृद्ध महाराष्ट्र" या अभियान अंतर्गत जिल्ह्यात एक कोटी वृक्ष लागवड करण्याची नाळ जोडून स्थानिक तहसील कार्यालयाच्या पटांगणात अतिरिक्त जिल्हाधिकारी संजय आसवले यांच्या हस्ते तथा तहसीलदार बालाजी सोमवंशी यांच्या उपस्थितीत वृक्षारोपण करून अभियानात जास्तीत जास्त वृक्ष लागवड करण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला.
       जुलै व ऑगस्ट महिन्यात वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट संपूर्ण तालुक्यात पूर्ण करण्यात येणार असून जनजागृती म्हणून वृक्षारोपण ही लोक चळवळ जनमानसात रुजविण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे.
           यावेळी विविध जातीची वृक्षांची रोपे तहसीलच्या परिसरात लावण्यात आले. लागवड करताना नायब तहसीलदार प्रतीक आढाव, नायब तहसीलदार नरेंद्र दाते, नायब तहसीलदार वाभितकर, नायब तहसीलदार कल्पना सुर्पाम तसेच कार्यालयातील संपूर्ण कर्मचारी, तालुक्यातील विविध साजाचे तलाठी व महसूल अधिकारी यावेळी उपस्थित होते.

Comments