जानवळे ओझरवाडी येथे नविन साकव संदर्भात मनसेच्या वतीने विनोद जानवळकर यांचे जिल्हाधिकारी यांना निवेदन

गुहागर तालुक्यातील जानवळे ओझरवाडी येथे नविन साकव संदर्भात मनसेच्या वतीने उपजिल्हाध्यक्ष विनोद जानवळकर यांनी जिल्हाधिकारी, रत्नागिरी यांना निवेदन सादर केले आहे. सदर निवेदनाच्या प्रती मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद रत्नागिरी, सचिव जिल्हा नियोजन समिती रत्नागिरी, मुख्य लेखा व वित्त अधिकारी जिल्हा परिषद रत्नागिरी यांना देण्यात आले आहे. दिलेल्या निवेदनात त्यांनी म्हटले आहे की,
गुहागर तालुक्यातील जानवळे गावातील ओझरवाडी येथे साकव बांधण्यात आला आहे. या साकवाचा फायदा गावातील पुढील वाडीतील ग्रामस्थांना होणार आहे का..? याची चौकशी करण्यात यावी.तसेच साकवापर्यंत जाणा-या रस्त्याची किंवा पायवाटेची कुठेही शासकीय दप्तरी २३ नंबरला नोंद नाही. ग्रा.पं. जानवळे यांनी कुठल्याही मागणीचे पत्र किंवा प्रस्ताव पंचायत समिती किंवा जिल्हा परिषद कार्यालयाकडे सादर करण्यात आलेला नाही.परंतु या साकवापलीकडे लोकवस्ती आहे परंतु तेथील पुढील रस्ता बंद आहे तरी यांची आपल्या कार्यालय कडून योग्य ती चौकशी करण्यात यावी.
मुख्य रस्ता जानवळे हेमंत हॉटेल ते साईबाबा मंदिर मार्ग शेजारी ओझरवाडी येथे जाण्या-येण्यासाठी व वाहतुकीसाठी साकव पलीकडून कुठपर्यंत जाणार आहे. या साकवाचा सर्वसामान्य जनतेला उपयोग होणार आहे का..?
महसूल विभागामार्फत जो गट नंबर २४८ बिनशेती करण्यात येतो, त्याच्या जागेमधून वाट देणे बंधनकारक असते तरी सदर लाभार्थी इतर लोकांना जागा देत नाही, नवीन शासन निर्णयाप्रमाणे पुढील घरासाठी किंवा वाडीतील लोकांसाठी जागा देणे बंधनकारक असताना पण त्यांना पायवाट/ जागा दिली जात नाही.वरिल विषयांची चौकशी करण्यात येऊन आपल्या लेखी अभिप्राय कळविण्यात यावा हिच अपेक्षा शेवटी विनोद जानवळकर यांनी निवेदनाद्वारे व्यक्त केली आहे.

Comments