उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री अजितदादा पवार यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून आम. शेखर निकम यांचे संकल्पनेतून वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात संपन्न
महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री श्री.अजितदादा पवार यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून चिपळूण-संगमेश्वर विधानसभा मतदार संघाचे आमदार शेखरजी निकम यांचेकडून शरदचंद्रजी पवार कृषि महाविद्यालय, खरवते-दहिवली येथे वृक्षारोपण कार्यक्रम आयोजित करण्यात आला.नामदार अजितदादा पवार यांचा वाढदिवस विधायक उपक्रमातुन साजरा करण्याच्या उद्देशातून हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला.आमदार शेखरजी निकम यांच्या हस्ते महाविद्यालयाच्या प्रक्षेत्रावर वृक्षारोपण करण्यात आले तसेच त्यांच्या प्रेरणेतून महाविद्यालयामधील विद्यार्थ्यांकडूनही वृक्षारोपण करण्यात आले.
यावेळी आमदार शेखर निकम यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना संबोधित करत मार्गदर्शन केले.या कार्यक्रमास बोईसर विधानसभा मतदार संघाचे माजी आमदार राजेश पाटील ,महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.सुनितकुमार पाटील उपस्थित होते.या वेळी मान्यवरांसह विद्यार्थ्यांकडून फळे,फुले तसेच शोभिवंत झाडांचे रोपण करण्यात आले. महाविद्यालयातील उपस्थित विषयतज्ज्ञांकडुन रोपण केलेल्या झाडांचे फायदे तसेच लागवड पद्धती,नर्सरी व्यवस्थापन यांविषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले.या प्रसंगी महाविद्यालयामधील सर्व प्राध्यापक,शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Comments
Post a Comment